नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 18:40 IST2020-10-05T18:40:02+5:302020-10-05T18:40:10+5:30
कल्याण -ठाणे, कल्याण, अंबरनाथ ग्रामीण भागात भात पिकांचे सर्वाधिक नुकसान

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
डोंबिवली : परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजवला असून भात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील भात पिकांचे झालेले नुकसान पाहून शासनाने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ठाणे जिल्ह्यात भात पिकांचे सर्वाधिक उत्पादक शेतकरी घेत असतात.यंदा परतीच्या पावसाने ग्रामीण भागात वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्यानं भात पीक शेतात कोसळली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीक आज परतीच्या पावसाने हिरावून घेतली आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील भात शेतीचे झालेले नुकसान पाहता तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.