उल्हासनगरात मनसेचा मंदिर प्रवेश, मंदिर खुले करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 05:37 PM2020-10-07T17:37:13+5:302020-10-07T17:38:30+5:30

Ulhasnagar News : कारखाने, हॉटेल, बार, दुकानें सुरू करणाऱ्या सरकारने, नागरिकांच्या शांतीसाठी धार्मिकस्थळे उघडण्याची मागणी मनसेचे संजय घुगे, मैनुद्दीन शेख यांच्यासह पदाधिकारी यांनी केली. 

MNS Mandir entry in Ulhasnagar, demand to open the Mandir | उल्हासनगरात मनसेचा मंदिर प्रवेश, मंदिर खुले करण्याची मागणी

उल्हासनगरात मनसेचा मंदिर प्रवेश, मंदिर खुले करण्याची मागणी

Next

 उल्हासनगर - सरकारचा आदेश झुगारून शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी नामदेव वाडीतील शंकराच्या मंदिरात प्रवेश करून पूजा आरती केली. कारखाने, हॉटेल, बार, दुकानें सुरू करणाऱ्या सरकारने, नागरिकांच्या शांतीसाठी धार्मिकस्थळे उघडण्याची मागणी मनसेचे संजय घुगे, मैनुद्दीन शेख यांच्यासह पदाधिकारी यांनी केली. 

उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी शहरातील बार, हॉटेल, उपहारगृह व फूड कोर्ट यांना ५ आॅक्टोबर पासून सकाळी ९ ते रात्री १० वाजे पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले. आयुक्तांच्या आदेशामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असताना, बार, हॉटेल संघटनेने मात्र आयुक्तांच्या आदेशाचे स्वागत केले. तर दुसरीकडे मनसेचे माजी शहराध्यक्ष संजय घुगे, शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी कोरोना महामारी दरम्यान हॉटेल, बार आदींना रात्री उशिरा पर्यंत परवानगी मिळते. मग मंदिर उघडण्याचा परवानगी का नाही? असा प्रश्न केला. मंगळवारी दुपारी संजय घुगे, मैनुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प नं-१ येथील नामदेव वाडीतील शंकर मंदिरात मनसे सैनिकासह प्रवेश करून मंदिरात पूजा आरती व देवदर्शन केले. सरकारने राज्यात मंदिर उघडण्यास परवानगी दिली नाहीतर, मनसे राज्यभर मंदिरे उघडून पूजा आरती करणार असल्याचे संकेत संजय घुगे यांनी दिले आहे. 

यापूर्वी संपूर्ण हिंदुस्थानात मोगलाई असतांना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा-पगड जातींच्या मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अश्या राज्यात धार्मिक स्थळे बंद असल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाल्याची प्रतिक्रिया मैनुद्दीन शेख यांनी दिली. राज्यात दारूची दुकाने,बियर बार उघडण्याची परवानगी आघाडीचे सरकार देत आहे. मग धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी का नाही. असा प्रश्न यावेळी मनसेने केला. यावेळी माजी शहराध्यक्ष संजय घुगे, शहर संघटक मैनुद्दीन शेख, प्रवीण माळवे, काळू थोरात, अक्षय धोत्रे, सुहास बनसोडे, अनिल गोधडे, विक्रम दुधसाखरे, मुकेश चव्हाण, अमित सिंग, मनिष मोरे, सुनील खेडगीकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: MNS Mandir entry in Ulhasnagar, demand to open the Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.