नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका
By अजित मांडके | Updated: March 20, 2024 20:21 IST2024-03-20T20:20:57+5:302024-03-20T20:21:21+5:30
या ट्विटनंतर आता शिवसेना उध्दव ठाकरे आणि मनसे हे आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका
ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आणखी एक ठाकरे चोरण्याचा भाजपकडून प्रयत्न अशी टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरे नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाहीत. असा टोला ट्विट करत लगावला आहे. या ट्विटनंतर आता शिवसेना उध्दव ठाकरे आणि मनसे हे आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजसाहेब दिल्लीत गेले काय आणि इकडे अनेकांना पोटाचे आजार चालू झाले…
— avinash jadhav (@avinash_mns) March 20, 2024
संयम ठेवा थोडा.. राजसाहेब ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत राजकारण शिकलेले राजकारणी आहेत.. नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाहीत..
मंगळवारी राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. याप्रसंगी अमित ठाकरे उपस्थित होते. या भेटीत त्या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान उद्धव ठाकरे जाहीर सभेत टीका केली. त्या टीकेला बुधवारी अविनाश जाधव यांनी ट्विट करत प्रत्युत्तर देताना, राज दिल्लीत गेले काय आणि इकडे अनेकांना पोटाचे आजार चालू झाले आहे. संयम ठेवा थोडा असेही नमूद केले आहे. याशिवाय राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत राजकारण शिकलेले राजकारणी आहेत. असे स्पष्टीकरण देताना नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाहीत. अशी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका ट्विटद्वारे जाधव यांनी केली आहे.