अखेर  मीरा भाईंदरमध्ये मनसेला मिळाला नवीन शहराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:20 PM2020-02-24T12:20:42+5:302020-02-24T12:20:57+5:30

केवळ पोकळ इशारे द्यायचे वा निवेदने नेताना फोटो काढून घ्यायचे पण शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा नाही, अशा काही कार्यपद्धतीमुळे अनेक मनसैनिक नाराज आहेत.

MNS finally gets a new city president in Meera Bhayander | अखेर  मीरा भाईंदरमध्ये मनसेला मिळाला नवीन शहराध्यक्ष

अखेर  मीरा भाईंदरमध्ये मनसेला मिळाला नवीन शहराध्यक्ष

Next

मीरारोड : मीरा भाईंदर मनसेच्या शहर अध्यक्षपदी हेमंत सावंत यांची नियुक्ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे पद रिक्त होते. मीरा भाईंदर मनसेमध्ये गटबाजी मोठ्याप्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यातच शहरातील महत्वाच्या समस्या व विषयांवर मनसेने कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे समजते. 

केवळ पोकळ इशारे द्यायचे वा निवेदने नेताना फोटो काढून घ्यायचे पण शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा नाही, अशा काही कार्यपद्धतीमुळे अनेक मनसैनिक नाराज आहेत. शहराध्यक्ष असलेले प्रसाद सुर्वे  आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडत होते.  प्रवाद सुर्वे तर मला विचारल्याशिवाय पत्र व्यवहार करायचा नाही, असा कारभार चालवत असल्याची नाराजी मनसैनिकांमध्ये होती.

विधानसभा निवडणुकीआधी भाजपाचे तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत प्रसाद सुर्वे यांनी मनसेला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून सदरचे पद रिक्तच होते. राज ठाकरे यांनी शहर अध्यक्षपदी हेमंत सावंत यांची नियुक्ती केली असून स्वत: ठाकरे यांनी तसे नियुक्ती पत्र दिले. त्यावेळी ठाणे - पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सह दिनेश कनावजे, शशी मेंडन आदी उपस्थित होते.

सावंत यांना मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यासह मनसैनिकांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान आहे. शहर व पालिकेतील विविध विषयांवर आवाज उठवून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. २००७ सालच्या महापालिका निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते.

Web Title: MNS finally gets a new city president in Meera Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.