शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "भोंगे उतरवा हे सांगून समजत नसेल, तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणारच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:33 IST

राज ठाकरे यांचं वक्तव्य. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे : राज ठाकरे

"मशिदींवरील भोंग्यांबाबत आधीही बोललो होते तेव्हा अजित पवारांना ऐकू आलं नाही. मशिदींवरील भोंग्यांचा संपूर्ण देशाला त्रास होतोय यात धार्मिक विषय कुठे. तुम्हाला जे काही करायचंय घरात करा. शहरातील रस्ते, फुटपाछ का अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका हे जर सांगून समजत नसेल तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच," असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ठाण्यात आयोजित उत्तर सभेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

"वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नाही सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकं, विद्यार्थी महिलांना याचा त्रास होतो. एकतर सगळे बेसूर असतात. काय म्हणून ते ऐकायचं. रस्त्यावर घाण झाली, रस्ता साफ करतो, फुटपाथवर घाण झाली फुटपाथ साफ करतो, मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजे. आम्ही यातून मागे हटणार नाही हे राज्य सरकारला सांगणं आहे," असंही राज ठाकरे म्हणाले.

"या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे""या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. ज्या देशात देशात बंदी आहे तिकडे निमुटपणे ऐकतात. माझे अनेक मुस्लीम मित्र आहेत, ते सांगतात तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. असा कोणता धर्म आहे जो दुसऱ्यांना त्रास देतो. सध्या रमझान सुरूये आम्ही समजू शकतो. आमचाही गणेशोत्सव असतो, नवरात्रोत्सव असतो. काही दिवस समजू शकतो. ३६५ दिवस या गोष्टी कोणासाठी ऐकवता. ३ तारखेला ईद आहे. राज्य सरकारला, गृह खात्याला माझी विनंती आहे, दंगल, तेढ निर्माण करायचं नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवायचं नाही. १२ ते ३ मे यादरम्यान तुम्ही मौलवींना बोलवा भोंगे उतरवा हे सांगा.३ तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयानं यावर सांगितलं असेल तर राज्याच्या गृहखात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय हरकत आहे. मतांसाठी हे हव्या त्या पद्धतीनं धर्म चालवणार आणि उघड्या डोळ्यानं बघत बसायचं का? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे