विविध प्रश्नांवरून मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:03 IST2018-10-31T23:03:48+5:302018-10-31T23:03:56+5:30

तालुक्यामध्ये दुष्काळ जाहिर करावा, रखडलेली पाणी पुरवठा योजनेची त्वरीत अम्मल बजावणी करावी, घरकुल योजनेतील वंचीताना लाभ मिळावा आदी प्रश्नांबाबत मनसे कडनू प्रशासनाला जाब विचारण्यात आला.

MNS aggressor from various questions | विविध प्रश्नांवरून मनसे आक्रमक

विविध प्रश्नांवरून मनसे आक्रमक

जव्हार : तालुक्यामध्ये दुष्काळ जाहिर करावा, रखडलेली पाणी पुरवठा योजनेची त्वरीत अम्मल बजावणी करावी, घरकुल योजनेतील वंचीताना लाभ मिळावा आदी प्रश्नांबाबत मनसे कडनू प्रशासनाला जाब विचारण्यात आला. जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी मंगळवारी तहसीलदार संतोष शिंदे यांनी निवेदन दिले. बीडीओ शेखर रौदळ यांना पंचायत समिती येथे त्यांच्या दालनात घेराव घालण्यात आला होता.
तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल असुन शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जव्हार तालुक्याचे नाव नसल्याने जनतेत संतापाची भावना आहे तालुक्यात विविध ठीकाणी ८ ते १० वर्षा पूर्वी आठ ते दहा लाख रू. खर्च करून निर्माण केलेल्या पाणी योजना प्रत्यक्षात सुरूच् झालेल्या नाहीत. अशा योजना गटविकास अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष दाखवून त्याबाबत जाब विचारण्यात आला. घरकुल योजनेमध्ये काही ठिकाणी एकाच घरात दोन ते तीन लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजुर झालेली असून हजारो लाभार्थी वंचीत आहेत.

Web Title: MNS aggressor from various questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे