आमदार रईस शेख यांनी सुरू केली भिवंडीत नाविण्यपूर्ण आंचल मोहिम
By नितीन पंडित | Updated: June 1, 2023 20:19 IST2023-06-01T20:19:22+5:302023-06-01T20:19:34+5:30
भिवंडी मध्ये सुरक्षित व निरोगी मातृत्वाचे संगोपन करण्यासाठी आणि त्यातून मातामृत्यू व बालमृत्यू रोखणेकामी आमदार रईस शेख यांच्या पुढाकाराने आंचल नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

आमदार रईस शेख यांनी सुरू केली भिवंडीत नाविण्यपूर्ण आंचल मोहिम
भिवंडी: भिवंडी मध्ये सुरक्षित व निरोगी मातृत्वाचे संगोपन करण्यासाठी आणि त्यातून मातामृत्यू व बालमृत्यू रोखणेकामी आमदार रईस शेख यांच्या पुढाकाराने आंचल नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आंचल उपक्रमा अंतर्गत गरोदर व स्तनधा मातांची शहरात जागोजागी शिबिरांचे आयोजन करून माहिती संकलित करून त्यांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक तपासण्या व औषधोपचार देण्यात येत आहे.या शिबिरांमध्ये तज्ञांकडून आहार बाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याने या आंचल मोहिमेची भिवंडीकरांकडून प्रशंसा होत आहे.
भिवंडी शहरामध्ये जनजागृतीचा अभाव, अपुर्या पायाभूत आरोग्य सुविधा,आर्थिक संसाधनांचा अभाव इत्यादींमुळे मोठ्या प्रमाणात घरीच प्रसूतीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे.या समस्येचे निराकरण करण्यासाठी आधीच प्रसूती झालेल्या महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञां नी लिहून दिलेली औषधे,पौष्टिक प्रथिने, आणि इतर औषधी मदत देऊन त्यांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी केली आहे.
सध्या या योजने अंतर्गत सुमारे ३५० गर्भवती महिलांना विविध स्वरूपात वैद्यकीय मदत देण्यात आली आहे, त्यामुळे यशस्वी सुरक्षित आणि निरोगी प्रसुती झाल्या आहेत.विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना,शरीरात कॅल्शियम कमतरता असलेल्या महिलांना तसेच सात व नऊ महिन्यांच्या गरोदरपणातील महिलांना संपूर्ण मातृत्व सुरक्षा सुविधा प्रदान करण्याचे आंचलचे उद्दिष्ट आहे.यासाठी महिलांना नागरी आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्तीकडे अथवा आरोग्य सेविकेकडे नोंदणी करावी लागेल,त्या नंतर त्यांना आंचल किट प्रदान केले जाणार असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली आहे.