शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अनाधिकृत बांधकामांच्या मागील ब्रम्हा, विष्णु, महेश कोण?आमदार आव्हाडांनी केलं असं ट्विट

By अजित मांडके | Updated: December 7, 2022 15:53 IST

कळव्यासह, मुंब्रा, दिवा, कोपरी, उथळसर, घोडबंदर, आदींसह  शहराच्या इतर महत्वाच्या भागांमध्येही अनाधिकृत बांधकामे फोफावती चालली असल्याचे चित्र आहे.

ठाणे : मुंब्य्रातील नऊ बेकायदा धोकादायक इमारतींवरील न्यायालयीन कारवाई प्रलंबित असताना कळव्यासह, मुंब्रा, दिवा, कोपरी, उथळसर, घोडबंदर, आदींसह  शहराच्या इतर महत्वाच्या भागांमध्येही अनाधिकृत बांधकामे फोफावती चालली असल्याचे चित्र आहे. त्यातही कळव्यातील २० अनाधिकृत बांधकामांची यादी पालिकेला दिल्यानंतरही त्यावर कारवाई अद्यापही झालेली नाही. असे असतांना कळव्यात वाढत असलेल्या अनाधिकृत इमारतींच्या मुद्यावर आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच खवळले आहेत. अनाधिकृत बांधकाम ज्या पध्दतीने कळव्यात चालू आहे ते बघितल्यावर प्रशासन आहे कुठे? असा प्रश्न पडतो, आयुक्त, उपायुक्त यांच्याशी बोललो पण चालूच ब्रम्हा, विष्णु, महेश यांचे कारस्थान असे काहीसे टीव्ट करीत महापालिका आयुक्तांना थेट इशारा दिला आहे.

          कोरोना काळात ज्या पद्धतीने ठाणो पालिका क्षेत्नात अनाधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते. त्याच पद्धतीने बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट सुरु  झाला आहे. शहरात अशी किती बेकायदा बांधकामे सुरू आहेत याची माहिती मात्र पालिकेच्या दप्तरी नाही. किंबहुना त्याचा सव्र्हे देखील केला गेला नसल्याचे पालिका अधिकारी सांगतात, आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार महापालिकेने मागील काही महिन्यात अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करतांना एमआरटीपीची ३१  प्रकरणो दाखल केली आहे. मात्र ज्या भागात एमआरटीपी अंतर्गत कारवाई केली जात आहे, त्याच भागात नव्याने बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मुंब्य्रातील त्या ९ इमारतींचा मुद्दा चर्चेत असतांना कळव्यातील सुमारे २० अनाधिकृत बांधकामांची यादीच बाहेर आल्याने पालिकेच्या कारवाई बाबतही प्रश्न चिन्हे उभे राहिले आहे.

दरम्यान अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन आजी, माजी १४ सहाय्यक आयुक्तांची चौकशी लागली आहे. मात्र त्या चौकशीचे काय झाले याचे उत्तर आजही मिळू शकलेले नाही. त्यातही या बांधकामांच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर थातुरमातुर कारवाई प्रशासनाकडून केली जाते. मात्र पुन्हा या इमारती उभ्या राहतांना दिसत आहेत. या बांधकामांना प्रशासकीय पाठींबा मिळत असल्यानेच ही बांधकामे उभी राहत असल्याचे दिसत आहेत. त्यात कळव्यातर अनेकांनी जागेचा शोध घेऊन त्याठिकाणी थेट इमारतींचे बांधकाम सुरु केली आहेत, मग ती जागा खाजगी असो किंवा शासनाची असो याचा कोणताही विचार न करता तब्बल ९ माळ्यार्पयतच्या इमारती उभ्या राहत आहेत.

आता याच अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन आमदार आव्हाड यांनी पालिका आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. अनाधिकृत बांधकामांच्या विरोधात तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने या बांधकामांना पाठीशी घालणारे ते ब्रम्हा, विष्णु, महेश कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी केलेल्या या टीव्ट मधून त्यांना सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांना या माध्यमातून अप्रत्यक्षपणो निशाना साधल्याचेच दिसत आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडTwitterट्विटरThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका