उल्हासनगरातील हॅपी स्ट्रीट मध्ये आमदार आयलानी यांनीं धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 17:15 IST2023-12-03T17:14:46+5:302023-12-03T17:15:26+5:30
५० पेक्षा जास्त संघटना, योगा केंद्र, शाळा सहभागी

उल्हासनगरातील हॅपी स्ट्रीट मध्ये आमदार आयलानी यांनीं धरला ठेका
उल्हासनगर : गोलमैदान येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त सामाजिक संघटना, योगा संस्था, शाळेतील मुलांनी सहभाग घेतला. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी गाण्यावर ठेका धरल्याने, उत्साहाला उधाण आल्याचे चित्र होते.
उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील गोलमैदान येथे रविवारी सकाळी ७ ते १० वाजण्याच्या दरम्यान हॅपी स्ट्रीटचे आयोजन आमदार कुमार आयलानी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त संघटना सहभागी झाले होते. यामध्ये शाळेतील शिक्षक, मुले, योगा केंद्र यांच्यासह सामाजिक संघटना सहभागी झाले होते. तसेच नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी सर्वासमक्ष ठेका धरल्याने, सर्वामध्ये उत्साह संचारला.
या कार्यक्रमाला सिंधी समाजाचे संत भाऊ लीलाराम, ब्राह्मकुमारीच्या पुष्पा दीदि, भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, विधानसभा चुनावप्रमुख जमनूदास पुरसवानी, पूर्व महापौर मीना कुमार आयलानी, डॉ प्रकाश नाथानी, किशोर वनवारी, राजू जग्यासी, नाना बागुल, महेश सुखरामनी, मनोहर खेमचंदानी, डॉक्टर एस बी सिंग, जगदीश तेजवाणी, मंगला चांडा आदीसह नागरिक, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.