उल्हासनगरातील धुळीवर मिस्ट मशीनचा उतारा; महापालिकेने खरेदी केल्या दोन मिस्ट मशीन

By सदानंद नाईक | Updated: November 18, 2022 13:41 IST2022-11-18T13:40:13+5:302022-11-18T13:41:28+5:30

शहरवासीयांचे आरोग्य धुळी पासून वाचविण्यासाठी महापालिकेने दोन मिस्ट मशीनची खरेदी केली.

Mist Machine Extraction on Dust in Ulhasnagar; Municipal Corporation purchased two mist machines | उल्हासनगरातील धुळीवर मिस्ट मशीनचा उतारा; महापालिकेने खरेदी केल्या दोन मिस्ट मशीन

उल्हासनगरातील धुळीवर मिस्ट मशीनचा उतारा; महापालिकेने खरेदी केल्या दोन मिस्ट मशीन

उल्हासनगर :  शहरवासीयांचे आरोग्य धुळी पासून वाचविण्यासाठी महापालिकेने दोन मिस्ट मशीनची खरेदी केली. धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी मिस्ट मशिनद्वारे हवेत फवारा मारून धुळीचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाणार असल्याची माहिती मशीनच्या प्रात्यक्षिक वेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. 

उल्हासनगरात रस्ता पुनर्बांधणी व दुरुस्तीवर दरवर्षी ३० कोटी पेक्षा जास्त खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था आहे. रस्त्याच्या दुरावस्थामुळे धुळीच्या प्रमाणात वाढ झाली. नागरिकांना धुळीपासून सुटकारा देण्यासाठी महापालिकेने दोन मिस्ट मशीनची खरेदी केली. ज्याठिकाणी धुळीचे प्रमाण जास्त आहे.

अश्या ठिकाणी मिस्ट मशीनद्वारे फवारणी केल्यास, धुळीच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येणार आहे. गुरवारी दुपारी गोलमैदान परिसरात मिस्ट मशिनची प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली. मशिनद्वारे फवारणी करताच, काही मिनिटात धुळीचे प्रमाण कमी झाले. आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदूषण नियंत्रण विविध उपयोजना करण्यात येत आहेत. पर्यावरण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त करूणा जुईकर, विभाग प्रमुख विशाखा सावंत व वाहन विभागाचे प्रमुख विनोद केणे यांनी राष्ट्रीय हवा शुद्धीकरण कार्यक्रम अंतर्गत दोन मिस्ट मशीन खरेदी करून गुरवारी पासून कार्यान्वित केल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात या मशीनचा उपयोग होणार आहे.

महापालिकेची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या सुमारे ५,०६,०९८ असुन आजची अंदाजीत लोकसंख्या सुमारे ६.५ लाखा पेक्षा जास्त आहे. तसेच शहरात प्रसिद्ध मार्केट असल्याने, राज्यभरातून ५० हजारापेक्षा जास्त लोक खरेदीसाठी दररोज येत असतात‌. असे महापालिकेचे म्हणणे आहे. शहरामध्ये उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड असे तीन रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकामधून सुमारे 3 लाख लोकांची दररोज ये-जा सुरु असते. त्यामुळे रस्ते नियमीत सफाई ठेवणे व नागरीकांना एक चांगले वातावरण देणे महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. महापालिकेने रस्ता साफसफाई साठी २ पावर स्विपिंग मशीन व धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २ मिस्ट मशीन खरेदी केल्या आहेत. 

 धुळीच्या ठिकाणी मिस्ट मशिनद्वारे फवारणी

 शहरातील हवा प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करावयाच्या असून १५ व्या वित्त आयोगा व एनसीएपी अंतर्गत हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी मिळालेल्या निधीतुन हवा प्रदुषण नियंत्रण मशीन खरेदी केल्या आहेत. ज्या ठिकाणी धुळीचे प्रणामजास्त असेल त्याठिकाणी मिस्ट मशिनद्वारे फवारणी करून धुळीवर नियंत्रण मिळविण्यात येणार आहे.

Web Title: Mist Machine Extraction on Dust in Ulhasnagar; Municipal Corporation purchased two mist machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.