Mira Road: माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा
By धीरज परब | Updated: June 1, 2024 19:08 IST2024-06-01T19:08:17+5:302024-06-01T19:08:31+5:30
Mira Road: मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांनी मतदानाच्या दिवशी एका महिला कार्यकर्तीला अश्लील, अर्वाच्य शिवीगाळ आणि अपशब्द बोलल्या प्रकरणी शुक्रवार ३१ मे रोजी उत्तन सागरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Mira Road: माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा
मीरारोड - मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांनी मतदानाच्या दिवशी एका महिला कार्यकर्तीला अश्लील, अर्वाच्य शिवीगाळ आणि अपशब्द बोलल्या प्रकरणी शुक्रवार ३१ मे रोजी उत्तन सागरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
भाईंदरच्या उत्तन - पालखाडी भागात राहणाऱ्या महिला कार्यकर्त्या फ्रिडा मोरायस ह्या २० मे रोजी लोकसभा निवडणुक मतदान दिवशी उत्तन लाईट हाऊस भागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे यांच्यासाठी काम करत होत्या.
त्यावेळी मेंडोंसा हे तेथे आले आणि फ्रिडा यांना रागाने न्याहाळले. टेबलावर बसलेल्या मुलांना धमकावत धनुष्यबाण ला मतदान करण्यास सांगायचे असे म्हणाले.
फ्रिडा यांनी मोबाईल मधून व्हिडीओ शूटिंग सुरू केले असता त्यांच्या अंगावर धावून जात अश्लील , अर्वाच्य शिवीगाळ केली. अश्लील शेरेबाजी करत अपशब्द वापरले. अशी फिर्याद फ्रिडा यांनी ३१ मे रोजी दिल्या नंतर उत्तन सागरी पोलिस ठाण्यात माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा विरुद्ध विनयभंग सह अन्य कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या आधी देखील मेंडोंसा व फ्रिडा मोरायस यांच्यात धुसफूस होत होती.