शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

'मीरा-भाईंदर एकेकाळी होता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला; सर्वांना विश्वासात घेऊन युतीबाबत निर्णय', मंत्री आदिती तटकरे यांचं विधान    

By धीरज परब | Updated: October 31, 2025 14:59 IST

Aditi Tatkare News: मीरा भाईंदर हा एकेकाळचा बालेकिल्ला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत संघटना म्हणून सर्वांच्या सूचना व सर्वाना विश्वासात घेऊन युती बाबत ठरवू असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्क मंत्री अदिती तटकरे यांनी मीरारोड येथे केले.

मीरारोड- मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार, महापौर, उपमहापौर व सर्वात जास्त नगरसेवक आणि बळकट संघटना होती. एकेकाळचा हा बालेकिल्ला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत संघटना म्हणून सर्वांच्या सूचना व सर्वाना विश्वासात घेऊन युती बाबत ठरवू असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क मंत्री अदिती तटकरे यांनी मीरारोड येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मीरा भाईंदर मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या.

मीरारोडच्या रसाज सिनेमा जवळ राष्ट्रीवादी काँग्रेसचे शहर मध्यवर्ती कार्यालयचे उदघाटन गुरुवारी रात्री मंत्री तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी  माजी खासदार व प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे,  प्रदेश सरचिटणीस अनु पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष ममता मोराईस, युवा जिल्हाध्यक्ष जककी पटेल सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व जाती - धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणे हि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आहे. महायुती सोबत जाताना अनेकांना या बाबत प्रश्न पडला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सर्व धर्म समभाव ह्या विचारधारेशी तडजोड केली नाही. गृहमंत्री अमित शाह यांच्या कडे झालेल्या पहिल्या बैठकीत देखील अजितदादांनी आपली विचारधारा स्पष्ट करत त्याच्याशी तडजोड करणार नाही असे सांगितले होते.

मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, महापौर, उपमहापौर आणि जास्त नगरसेवक होते पक्षाची संघटना पण मोठ्या प्रमाणात होती लोकसभेत व विधानसभेत महायुतीच्या उमेदवाराचे काम केले. काम करत असताना सर्वांची इच्छा होती कि एके काळी बालेकिल्ला असताना आपल्याला पण अधिका अधिक जागा लढवायला मिळाली पाहिजे.

पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय किती महत्वाचे असते याची जाण सर्वाना आहे. ह्या कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी रोज बसले पाहिजेत. शहराच्या - नागरिकांच्या समस्या ह्या आमच्या पर्यंत व अजितदादांना पर्यंत पोहचवण्याची भूमिका घेतली पाहिजे. हे कार्यालय निवडणूक साठी आहेच पण येथील जनतेच्या सेवेसाठी आहे हा संदेश गेला लोकां मध्ये गेला पाहिजे. कामगार वर्ग, परप्रांतीय अनेक वर्षां पासून राहतात, महिला आदींच्या प्रश्नांना हात घातला पाहिजे.

आज अडीज कोटी पेक्षा जास्त महिलां पर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहचवला आहे. विरोधक टीका करत होते कि योजना बंद करतील. कोणत्याही सरकारने आणली नव्हती ती योजना महिलांसाठी आणली.  वित्त मंत्री अजित दादा आहेत आणि ४६ हजार कोटींची वार्षिक तरतूद आहे योजनेची. जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न महिला बाल विकास मंत्रालय करत आहे. आणखी पण अनेक योजना आहेत. राज्य बाहेरच्या महिलांना पण विविध योजनेतून लाभ देता येऊ शकतो. कामगार, महिला व आरोग्यातील योजना, बचत गट योजना आहेत त्याचा लाभ लोकांना मिळवून द्या असे मंत्री तटकरे म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira-Bhayandar: NCP's Former Stronghold; Decision on Alliance After Consultation, Says Minister.

Web Summary : Minister Aditi Tatkare inaugurated NCP's Mira-Bhayandar office, emphasizing unity and consultation for future alliances. She highlighted the party's commitment to secularism and its past strength in the region, aiming to regain influence by addressing local issues and leveraging government schemes.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAditi Tatkareअदिती तटकरे