शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

मीरा भाईंदर महापालिकेच्या मोकळ्या जागांवरील कराची थकबाकी १०० कोटींच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 13:20 IST

Mira Bhayander Municipal Corporation News : मीरा भाईंदर महापालिकेने उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मोकळ्या जागांवर कर आकारणी करण्यास सुरवात केली. भोगवटा दाखला घेई पर्यंत किंवा मालमत्ता कराची आकारणी होई पर्यंत मोकळ्या जागेवर कर लावला जातो

मीरारोड - सर्व सामान्य नागरिकांना कोरोना संसर्ग काळात मालमत्ता करात ५० टक्के सवलत न देणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेने मोकळ्या जागांवरील करापोटी असलेली तब्बल १०० कोटी रुपयां पेक्षा जास्तीची थकबाकी मात्र बिल्डरां कडून वसूल करण्यास कमालीची टोलवा टोलवी चालवली आहे .मीरा भाईंदर महापालिकेने उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मोकळ्या जागांवर कर आकारणी करण्यास सुरवात केली. भोगवटा दाखला घेई पर्यंत किंवा मालमत्ता कराची आकारणी होई पर्यंत मोकळ्या जागेवर कर लावला जातो . परंतु मोकळ्या जागांवरील कर आकारणीची सन २०२० - २०२१ ची एकूण मागणी विचारात घेतली तर थकबाकीची रक्कम तब्बल १०० कोटी १६ लाख ५५ हजारांच्या वर गेली आहे . ह्या पैकी मागील थकीत मागणी ७१ कोटी ७० लाख ७ हजार २९० तर चालू वर्षातील मागणी २८ कोटी ४६ लाख ४८ हजार २९८ इतकी आहे .१०० कोटीच्या थकबाकी पैकी न्यायालयीन व इतर कारणांसाठी आलेली स्थगितीची एकूण रक्कम ८ कोटी ९० लाख ९९ हजार ३७५ इतकी आहे . त्यातील ७ कोटी ५२ लाख ३६ हजार ९६९ हि मागील तर चालू वर्षातील स्थगितीची रक्कम १ कोटी ३८ लाख ६२ हजार ४०६ इतकी आहे .मालमत्ता कर आकारणी किंवा भोगवटा दाखला दिनांका पर्यंत केलेल्या मोकळ्या जागेची कर आकारणी परंतु भरणा न केलेली रक्कम हि ७ कोटी १३ लाख ३० हजार ६५३ इतकी आहे . त्यात मागील थकबाकी ६ कोटी ३७ लाख ३६ हजार ८५८ तर चालू वर्षातील थकबाकी ७५ लाख ९३ हजार ७९५ इतकी आहे .गंभीर बाब म्हणजे मोकळ्या जागेवरील कराची वेळीच वसुली न केली गेल्याने व्याजाची रक्कम सुद्धा तब्बल २४ कोटी ७६ लाख ३९ हजार इतकी झाली आहे . त्यातही मागील थकीत १५ कोटी ७२ लाख ८ हजार २७१ तर चालू वर्षातील व्याजाची रक्कम ९ कोटी ४ लाख ३० हजार ७४९ इतकी आहे .न्यायालयीन व वादातील प्रकरणे तसेच मालमत्ता कर व भोगवटा दाखला दिलेल्या थकीत रकमेला वगळून एकूण थकबाकीची रक्कम ५३ कोटी ३७ लाख ८४ हजार ६५० रुपये इतकी राहिली आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे . . मोकळ्या जागेवरील सन २०२० - २१ ची निव्वळ मागणी हि ५९ कोटी ३५ लाख ८६ हजार ५४० रुपये असून त्यात मागील थकबाकी ४२ कोटी ८ लाख २५ हजार १९२ तर चालू वर्षाची रक्कम १७ कोटी २७ लाख ६१ हजार ३४८ रुपये इतकी आहे .पालिकेने चालू आर्थिक वर्षात एकूण ५ कोटी ९८ लाख १ हजार ८९० रुपये इतकी मोकळ्या जागांची कर वसुली केलेली आहे . त्यातील २ कोटी ४१ लाख ३८ हजार ३११ हि मागील थकबाकी पैकी तर ३ कोटी ५६ लाख ६३ हजार ५७९ चालू कराची आहे .पालिकेच्या म्हणण्या नुसार सन २०२० - २१ ची थकबाकी हि ५३ कोटी ३७ लाख ८४ हजार ६५० रुपये इतकी असून त्यापैकी ३९ कोटी ६६ लाख ८६ हजार ८८१ हि मागील थकबाकी तर १३ कोटी ७० लाख ९७ हजार ७६९ हि चालू वर्षाची थकबाकी असल्याचे स्पष्ट केले आहे .एकट्या ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीची १२ प्रकल्पांची थकबाकी ३ कोटी ९२ लाख ५६ हजार १०४ रुपये इतकी आहे . सामान्य नागरिकाचा काही हजार रुपयांचा कर थकला तरी नळ जोडणी तोडण्या पासून मालमत्ता जप्त करणारी पालिका ह्या बड्या थकबाकीदारांवर मात्र कठोर कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नसल्याने लोकां मधून संताप व्यक्त होत आहे .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरTaxकर