शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

मिरा-भाईंदर महानगरपालिका : भाजपने केलेल्या नियुक्त्या स्थगित, नगरविकास विभागाने उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 08:49 IST

Mira-Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या बळावर स्वीकृत सदस्य नियुक्ती व तदर्थ समिती सदस्य नियुक्ती करून शिवसेनेसह काँग्रेसला धक्का दिला होता.

मीरा राेड : मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या बळावर स्वीकृत सदस्य नियुक्ती व तदर्थ समिती सदस्य नियुक्ती करून शिवसेनेसह काँग्रेसला धक्का दिला होता. परंतु आ. गीता जैन यांच्या तक्रारीवरून नगरविकास विभागाने या दोन्ही ठरावांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचा हा भाजपला प्रतिधक्का मानला जात आहे.मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडे पूर्ण बहुमत असून गेल्या सोमवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने पाणीपुरवठा व मलनिस्सारण, शिक्षण, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार, क्रीडा व सांस्कृतिक, विधि आणि नियोजन, आरोग्य व वैद्यकीय साहाय्य, उद्यान व शहर सुशोभीकरण अशा चार तदर्थ समित्यांवर भाजप नगरसेवकांच्या नियुक्तीचे ठराव केले.त्याविरोधात आ. जैन यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून तदर्थ समित्या या जुलै २०१८ ते जुलै २०१९ या काळापुरत्याच होत्या. त्यामुळे त्या रद्द झालेल्या असून त्या पुन्हा स्थापन करण्यासाठी सभागृहात दोनतृतीयांश संख्याबळ आवश्यक होते. मात्र, तसे संख्याबळ नसताना भाजपने केवळ त्यांच्याच सदस्य नियुक्तीचा ठराव केल्यामुळे तो नियमबाह्य असल्याने विखंडित करण्याची मागणी केली होती.स्वीकृत सदस्य नियुक्तीचा ठराव करताना भाजपने बहुमताच्या बळावर आयुक्तांनी प्रस्तावात दिलेल्या पाचपैकी भाजपचे तीन आणि काँग्रेसच्या एक अशा चार उमेदवारांचीच स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली. शिवसेनेच्या उमेदवारास त्याने कोरोना काळात जेवण पुरवण्याचे कंत्राट घेतल्याचा आक्षेप घेत त्याचे नाव वगळले. आ. जैन यांनी स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा ठरावही विखंडित करण्याची तक्रार मंत्र्यांकडे केली होती.शहरात शिवसेना व भाजपमध्ये राजकारण तापू लागले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा