शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेकडून प्रामाणिक कर दात्यांची थट्टा, थकबाकीदारांना ७५ टक्के व्याज माफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:46 IST

Mira Bhayander Municipal Corporation : सवलतीच्या अपेक्षेने मोठ्या संख्येने प्रामाणिक करदात्यानी मालमत्ता कर भरला. परंतु आजतागायत सत्ताधारी भाजपा व प्रशासनाकडून प्रामाणिक करदात्यांना कोणतीच सवलत दिली गेली नाही. 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने प्रामाणिक करदात्यांना कोरोना संसर्गाच्या अडचणीच्या काळात कोणतीच सवलत - सूट दिली नसली तरी वर्षा न वर्ष कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे सवलतीचा हवाला देऊन तब्बल ७५ टक्के व्याज माफ करण्याचा निर्णय अभय योजनेच्या नावाखाली अमलात आणला आहे. पालिकेच्या या थकबाकीदारांना फायदा करून देण्याच्या प्रकारा मुळे प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या वर्षी सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता नोकरी - व्यवसाय ठप्प होते. त्यावेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर ऑक्टोबर २०२० भरल्यास निवासी व वाणिज्य वापरातील मालमत्ता ना ५० टक्के सवलत देण्याचा ठराव केला होता. त्याच वेळी थकबाकीदारांचे व्याज सुद्धा १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

सवलतीच्या अपेक्षेने मोठ्या संख्येने प्रामाणिक करदात्यानी मालमत्ता कर भरला. परंतु आजतागायत सत्ताधारी भाजपा व प्रशासनाकडून प्रामाणिक करदात्यांना कोणतीच सवलत दिली गेली नाही. एकीकडे दरवर्षी नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना कोणतीच सवलत न देताना महापालिकेने आता अभय योजना अमलात आणून थकबाकीदारांना मात्र थकीत व्याजावर तब्बल ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यापासून कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर सवलतीचा वर्षाव केला जात आहे. त्यामुळे नियमित कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना व्याजाची केवळ २५ टक्केच रक्कम भरावी लागणार आहे. 

मालमत्ता कर थकबाकीदारांवर कृपादृष्टी करत महापालिकेने २५ फेब्रुवारी ते १५  मार्च या १९ दिवसांच्या कालावधीसाठी ही अभय योजना राबवली आहे. या कालावधीत मालमत्ता कराच्या रकमेसह आकारण्यात आलेल्या व्याजाची २५ टक्के रक्कम थकबाकीदारांचे भरल्यास त्याला ७५ टक्के व्याजाच्या रकमेत माफी मिळणार आहे. 

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अभय योजने अंतर्गतव्याजाची  ७५ टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय प्रशासनाकडून  घेण्यात आला आहे. यासाठी पालिकेकडून १९ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी मालमत्ता कर व थकीत व्याजा पैकीची केवळ २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज पालिका माफ करणार आहे.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरTaxकर