मीरा भाईंदर क्राईम बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:16 IST2021-02-18T05:16:08+5:302021-02-18T05:16:08+5:30

मीरारोड : गुन्हे शाखेच्या युनिट-एकने काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तस्करास चार किलो गांजासह अटक केली ...

Mira Bhayander Crime News | मीरा भाईंदर क्राईम बातम्या

मीरा भाईंदर क्राईम बातम्या

मीरारोड : गुन्हे शाखेच्या युनिट-एकने काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तस्करास चार किलो गांजासह अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-एकचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी सह अविनाश गर्जे, सुशील पवार, सतीश जगताप आदींच्या पथकाने डेल्टा गार्डन येथील पाण्याच्या टाकी समोरील रस्त्यावर एका रिक्षात गांजाच्या साठ्यासह तस्करास पकडले. जोगेश्वरीत राहणाऱ्या या ३७ वर्षीय तस्कराकडून ६० हजार रुपये किमतीचा चार किलो गांजा व गांजा विक्रीतून गोळा केलेले १९ हजार ७०० रुपये व त्याची रिक्षा पथकाने ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास काशीमीरा पोलीस करीत आहेत.

.............

लॉजच्या आवारातून दोन दलालांना अटक

मीरारोड : मीरारोडच्या अंतःपुरा लॉजिंग एन्ड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या माहितीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक भास्कर पुकळे यांच्यासह पाटील, आसवले, ढेमरे, निलंगे, धानवा यांच्या पथकाने सापळा रचून लॉजच्या वाहन पार्किंगच्या आवारात वेश्या व्यवसायासाठी आलेल्या दोन पीडित तरुणींसह आशिकसाहेब शेख ( २७, रा. गोखिवरे तलावाजवळ, नालासोपारा) व २५ वर्षीय नालासोपारा येथे राहणारी दलाल महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींवर नया नगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम व भादंविच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पीडितांची सुटका करण्यात आली आहे.

..........

वाचली

Web Title: Mira Bhayander Crime News