शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये कोरोनामुळे आणखी १२ परिसर बाधित घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 14:08 IST

शहरातील एकुण बाधित क्षेत्रांची संख्या ४५

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे शुक्रवार सकाळच्या पालिका अहवाला पर्यंत ११७ रुग्ण झाले असुन महापालिकेने शहरातील आणखी १२ परिसर हे कोरोना बाधित क्षेत्र म्हणुन जाहिर केले आहे. प्रशासनाच्या आदेशातील आकडेवारी नुसार शहरातील एकुण बाधित क्षेत्रांची संख्या ४५ पर्यंत पोहचली आहे.आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी २३ एप्रिल रोजी आदेश काढुन भार्इंदरच्या शिर्डि नगर, बाबासाहेब आंबेडकर नगर गल्ली ५, इंदिरा कॉम्पलॅक्स, न्यु गोल्डन नेस्ट, इंद्रलोक फेज ६, खारीगाव मधील परिसर हे कोरोना बाधित क्षेत्र जाहिर केले आहेत. शिवाय काशिमीराचे राज इस्टेट समोर तर मीरारोडचे प्लेझेंट पार्क, आबिद पटेल शाळे जवळ, नया नगर, साई कॉम्पलॅक्स, शांती नगर सेक्टर - १० बाधित क्षेत्र जाहिर केली आहेत.या आधी देखील कोरोना रुग्ण आढळलेले परिसर बाधित क्षेत्र म्हणुन प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत. आता पर्यंत कोरोना बाधित क्षेत्रांची संख्या ४५ झालेली आहे. या बाधित क्षेत्रां साठी पालिकेचे वैद्यकिय अधिकारी, पोलीस अधिकारी - कर्मचारी व पालिका कर्मचारी यांच्या पथकांची नियुक्ती सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत करण्यात आली आहे.या बाधित क्षेत्रातील नागरिकांना भाजीपाला, दुध, अन्नधान्य, औषधे मिळण्यासाठी सहकार्य करावे. नागरिकांना घरा बाहेर पडु न देणे, रस्त्यावर अनावश्यक फिरु न देणे, गर्दी टाळणे, इमारतीच्या पदाधिकारायांशी समन्वय ठेवणे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांना कळवणे आदी जबाबदाराया आयुक्तांनी या पथकांना नेमुन दिल्या आहेत. कोरोनाचा घट्ट होत चाललेला विळखा सोडवण्यासाठी बाधित क्षेत्रांसह शहरातील अन्यभागातील नागरिकांनी देखील शासन - पालिका निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या