शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरचे नगरसेवक देणार पूरग्रस्तांसाठी एका महिन्याचे मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 22:32 IST

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मीरा-भाईंदर महापालिकेचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन देणार आहेत.

मीरा रोड - पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मीरा-भाईंदर महापालिकेचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन देणार आहेत. महापालिका आयुक्त देखील महिन्याचे वेतन देणार असून, वर्ग १ व २ चे अधिकारी १५ दिवसांचे तर वर्ग ३ - ४ चे कर्मचारी ५ दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देतील. या शिवाय महापालिका १ कोटी रुपये देणार आहे.आज बुधवारी झालेल्या महासभेत पूरग्रस्तांसाठी शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी सेनेचे सर्व २२ नगरसेवक महिन्याभराचे मानधन देणार असल्याचे सांगीतले. तसे लेखीपत्र महापालिकेस सेनेने दिले आहे. उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी देखील भाजपाचे सर्व ६१ नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसने आधीच त्यांचे नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार असल्याचे म्हटले होते.उपमहापौर वैती यांनी या वेळी महापालिकेने देखील पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी सूचना आयुक्तांना केली. त्यावर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी महासभेने तसा ठराव करावा व तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवेन असे सांगितले. यावेळी आयुक्तांनी आपण आपला महिन्याभराचा पगार पूरग्रस्तांसाठी देत असल्याचे सांगत महापालिकेतील वर्ग १ व २ चे अधिकारी आपले १५ दिवसांचे वेतन देणार आहेत, तर वर्ग ३ व ४ चे कर्मचारी आपले ५ दिवसांचे वेतन देणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महासभेने एक सर्वपक्षीय समिती तयार करून शहरातील उद्योजक, दानशूर आदींना आवाहन करून निधी गोळा करावा आणि तो पूरग्रस्तांसाठी द्यावा, अशी सूचना देखील आयुक्तांनी केली.भाजपाच्या नगरसेविका दीपाली मोकाशी यांनी मात्र मदतीचे मार्केटिंग करू नका, असे सुनावत तेथे प्रत्यक्ष तिकडची परिस्थिती पहा म्हणजे तुम्हाला कळेल. डॉक्टरांचे पथक पाठवा. पूरग्रस्तांना माणुसकी म्हणुन मदत करा , कीती केली ती दाखवायची गरज नाही. मदतीचा केवळ ड्रामा चालला आहे, असा संताप व्यक्त केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरSatara Floodसातारा पूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर