शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मिरा भार्इंदर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये २५ टक्के कपात करण्याच्या पालिकेच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 20:32 IST

आरोग्य, वैद्यकिय, उद्यान, आस्थापना, परिवहन आदी विभागातील कार्यरत सुमारे ३ हजार कंत्राटी कर्मचारयांच्या संख्येत तब्बल २५ टक्के इतकी कपात करण्याच्या हालचाली मिरा भार्इंदर महापालिकेच्या प्रशासनाने सुरु केल्या आहेत.

- धीरज परबमिरारोड -  मिरा भार्इंदर महापालिकेच्या स्थायी व अस्थायी आस्थापनेचा खर्च तब्बल ६० टक्के पर्यंत पोहचला असून, नियमा नुसार तो महसुली उत्पन्नाच्या ३५ टक्के मर्यादेत असायला हवा. परिणामी पालिकेच्या काटकसरी धोरणा खाली आता आरोग्य, वैद्यकिय, उद्यान, आस्थापना, परिवहन आदी विभागातील कार्यरत सुमारे ३ हजार कंत्राटी कर्मचारयांच्या संख्येत तब्बल २५ टक्के इतकी कपात करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत.मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य, आस्थापना, वैद्यकिय, उद्यान, परिवहन आदी विभागां मध्ये कंत्राटी पध्दतीने सुमारे ३ हजार कर्मचारी घेतले आहेत. तर पालिकेच्या कायम सेवेतील सुमारे दिड हजार कर्मचारी आहेत. पालिकेच्या सेवेत कायम स्वरुपी कर्मचारयां पेक्षा कंत्राटी पध्दतीने काम करणारया कंत्राटी कर्मचारयांची संख्या जवळपास दुप्पट आहे.आरोग्य विभागात १३९९ कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत. सदर सफाई कामगार हे ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट या ठेकेदाराच्या माध्यमातुन शहरातील दैनंदिन कचरा व गटार सफाईचे काम करतात.पालिकेने मुख्यालयासह विविध कार्यालयं, उद्यान, मैदान, स्मशान भुमी आदी ठिकाणी ७१२ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सदर सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम पालिकेने सैनिक सिक्युरीटी ला दिलेले आहे. परिवहन विभागात देखील सुमारे साडेतीनशे कर्मचारी ठेका पध्दतीने घेण्यात आलेले आहेत.उद्यान विभागात २७५ मजुर तरआस्थापना विभागात ८० संगणक चालक आहेत. शिवाय वैद्यकिय विभागात डांस निर्मुलनासाठी किटकनाशक फवारणी करणारे १८१ कर्मचारी कंत्राटी पध्दतीनेच घेण्यात आले आहेत.दुपटीने कंत्राटी कर्मचारी पालिका सेवेत कार्यरत असुन पालिकेचा आस्थापने वरचा खर्च देखील मोठा आहे. त्यामुळे पालिके वरील असणारा कर्जाचा डोंगर, उत्पन्नाचे कमी असलेले स्तोत्र, कामांवर होणारा वाढता खर्च आदींचा लेखा जोखा मांडत प्रशासनाने कंत्राटी कर्मचारयां मध्ये किमान २५ टक्के कपात करण्यात यावी असा पावित्रा घेतला आहे.या संदर्भात उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. बैठकीत कंत्राटी कर्मचारयांच्या कपाती बद्दल चर्चा करण्यात आली.त्या अनुषंगाने आरोग्य, आस्थापना, परिवहन, उद्यान, वैद्यकिय आरोग्य या विभागाच्या विभाग प्रमुखांना उपायुक्त मुख्यालय म्हसाळ यांनी पत्रक काढले आहे. स्थायी व अस्थायी कर्मचारयां वरील आस्थापनेचा खर्च ६० टक्के पर्यंत गेला आहे. त्यामुळे २०१५ ते २०१७ दरम्यानच्या कालावधीत कार्यरत कमरचारयांच्या संख्येचा आणि कामाचा अभ्यास करावा. इतकी कामगार वाढ का झाली ? आदी मुद्दे उपस्थित करत सदर विभागाच्या विभाग प्रमुखांना आपल्या स्तरावर २५ टक्के कंत्राटी कर्मचारी कपातीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगीतले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकEmployeeकर्मचारी