मीरा-भार्इंदर पाण्याखाली? बेकायदा भरावाकडे पालिकेची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:37 AM2018-04-06T06:37:48+5:302018-04-06T06:37:48+5:30

मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे.

 Mira-Bhairindar under water? Disregard of illegal payment | मीरा-भार्इंदर पाण्याखाली? बेकायदा भरावाकडे पालिकेची डोळेझाक

मीरा-भार्इंदर पाण्याखाली? बेकायदा भरावाकडे पालिकेची डोळेझाक

Next

मीरा रोड   -  मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे. शहरात पाणी साचण्यासह पर्यावरणाचा मोठा ºहास होत असून या माफियांना काही लोकप्रतिनिधींसह विविध सरकारी यंत्रणांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आशीर्वाद असल्याने दिवसाढवळ्या व रात्री खुलेआम चालणाºया भरावास लगाम घातला जात नाही. पालिकेने नेमलेले मातीभरावविरोधी पथकही कूचकामी ठरले आहे.
मीरा-भार्इंदर हे उत्तर व दक्षिणेस खाडीने वेढलेले आहे. तर, पश्चिमेस समुद्र असून पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची डोंगररांग आहे. पावसाळ्यात डोंगरांवरून मोठ्या प्रमाणात येणारे पाणी हे नैसर्गिक ओढे-नाले व खाडीमार्गे बाहेर पडायचे. किनारपट्टी परिसरात व अंतर्गत असलेली पाणथळ, कांदळवनाचे जंगल, मिठागरे, सीआरझेड व नाविकास क्षेत्रही पावसाचे पाणी सामावून घेणारी व पाण्याचा निचरा होणारी नैसर्गिक अशी महत्त्वाची क्षेत्रे होती. मात्र, काही वर्षांपासून शहरातील या नैसर्गिक पावसाळी व भरतीचे पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकाराचा भराव, बांधकामास मनाई असतानाही सर्रास बेकायदा कचरा, दगड-माती व डेब्रिजचा भराव होत आहे. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह भराव व बांधकामांमुळे बंद झाले आहेत.
याविरोधात ठोस भूमिका घेण्याऐवजी लोकप्रतिनिधी, महापालिका, महसूल, पोलीस व मीठ विभाग हे एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. परिणामी, पावसाळ्यात डोंगरावरून येणाºया पाण्याच्या लोंढ्यामुळे काशिमीरा व परिसर पूर्ण जलमय करून पूरस्थिती निर्माण होते. अनेक भागांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना फटका बसत आहे. त्यातही पालिकेने या नैसर्गिक ओढे-खाड्यांना नाले ठरवत त्यांचे काँक्रिटीकरण चालवले आहे. बंदिस्त नाले प्लास्टिक, गाळाने तुंबत असताना त्यांची सफाई केली जात नाही.
विविध प्रकल्पांमधून निघणारे दगड-माती, गाळ टाकण्यासाठी मीरा-भार्इंदर व वसई-विरार हे डम्पिंग यार्ड ठरले आहे. शिवाय, नाले, तलाव सफाई तसेच खाजगी कामातून निघणारी दगड-माती, गाळही पाणी साठवण्याच्या वा पाणी वाहून जाणाºया प्रवाहात टाकले जात आहे. डेब्रिजही सर्रास पाणथळ, कांदळवन भागात टाकले जाते. सरकारी जागेत चालणाºया भरावाकडेही कानाडोळा केला जात आहे. अर्थपूर्ण हित साध्य होत असल्याने माफियांचे थेट काही लोकप्रतिनिधी, पालिका, महसूल, मीठ विभाग व पोलीस यांच्याशी साटंलोटं असल्याच्या आरोपांना बळ मिळत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी माती व डेब्रिजचा भराव रोखण्यासाठी दोन पथके नेमली होती. यात मुकादमांसह स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश केला. त्यांना स्वतंत्र वाहने देण्यात आली. पथकाला भराव आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.


बांधकामे होत असलेली ठिकाणे

कनकिया, हाटकेश, नेमिनाथ हाइट्स - टाकी परिसर, काशिगाव परिसर, घोडबंदर, रेतीबंदर, वरसावे, एक्स्प्रेस ईन हॉटेलमागील परिसर, चेणे नदी, चेणे - काजूपाडा, माशाचापाडा - डाचकुलपाडा, महाजनवाडी, पेणकरपाडा, सृष्टी, मीरागाव परिसर, पूनम सागर - जाफरी खाडी, शांतीनगर, आरएनपी पार्क, जेसल पार्क, सरस्वतीनगर - शिवशक्तीनगर, नवघरगाव, इंद्रलोक, भार्इंदर पश्चिमेस उड्डाणपुलाखालील रेल्वे मार्गाजवळचा परिसर, राधास्वामी सत्संग व परिसर, नाझरेथ झोपडपट्टी, शास्त्री व नेहरूनगर, मुर्धा खाडी, रेव आगर, सदानंदनगर, मुर्धा बांध, राई - शिवनेरी, मोर्वा गाव व आरके क्रीडांगण परिसर, तारोडी ते चौक धक्का, डोंगरी ते कोपरा, उत्तन, भार्इंदर पश्चिम धक्का ते जय अंबे, गणेश देवल, बजरंगनगर, क्रांतीनगर.

Web Title:  Mira-Bhairindar under water? Disregard of illegal payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.