शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर : महापालिकेच्या घोडबंदर शाळेत 5 वर्षांपासून मुख्याध्यापकच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 19:59 IST

मीरा-भाईंदर महापालिकेच्या घोडबंदर येथील पालिका शाळेत गेल्या पाच वर्षां पासून मुख्याध्यापकच...

मीरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या घोडबंदर येथील पालिका शाळेत गेल्या पाच वर्षां पासून मुख्याध्यापकच नसल्याने मनविसेच्या शिष्ट मंडळाने शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी यांना घेराव घातला . मुख्याध्यापक नेमला नाही तर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. 

महापालिकेची घोडबंदर गावातील शाळा ही जुनी असून १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग आहेत . घोडबंदरच्या या  पालिका शाळा क्र ९ मध्ये २०१३ पासून मुख्याध्यापकच नाही. आधीचे मुख्याध्याप यांची मार्च २०१३ मध्ये झाल्यावर दुसरा मुख्याध्यापकच नेमण्यात आला नाही . तर अनेक वर्ष शिक्षिका असलेल्या रजनी चव्हाण ह्या शाळेलच्या मुख्याध्यापकाचा कारभार सांभाळत आहेत . चव्हाण या अनुभवी असल्या तरी मुख्याध्यापकाचे त्यांना अधिकार नसल्याने अनेकवेळा अडचण होत असते . 

सतत पाच वर्षे  विना मुख्याध्यापकाची शाळा चालत असल्याने पालिकेमार्फत मिळणाऱ्या काही सुविधांपासून वंचित राहिल्याचे सांगत मनविसेने  शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांना घेराव  घातला. शाळेला लवकरात लवकर मुख्याध्यापक बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार पालिकेला दिलेला नाही. असे प्रकार घडलेच तर मनविसे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उग्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला . येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०१८ पासून सदर शाळेला मुख्याध्यापक देणार आहोत असे आश्वासन  देशमुख यांनी दिले. 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे  मीरा भाईंदर शहर सचिव शान पवार,  गणेश बामणे, शेरा पुरोहित, प्रवीण पाटील, ऋषीकेश नलावडे, महेश चव्हाण, विजय राठोड, अक्षय पारकर, विशाल कदम, दादा कदम व इतर मनविसे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकSchoolशाळा