अल्पवयीन तरुणीचे अपहरण करणारा अटकेत , फेसबुकवर प्रेम : पंजाबमधून आला अंबरनाथमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:18 AM2017-10-18T06:18:40+5:302017-10-18T06:18:59+5:30

फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर पंजाबमधील लुधियाना येथील हॅप्पी शर्मा या युवकाने अंबरनाथमधील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले.

 A minor kidnapped girl abducted, love on Facebook: Ambernath came from Punjab | अल्पवयीन तरुणीचे अपहरण करणारा अटकेत , फेसबुकवर प्रेम : पंजाबमधून आला अंबरनाथमध्ये

अल्पवयीन तरुणीचे अपहरण करणारा अटकेत , फेसबुकवर प्रेम : पंजाबमधून आला अंबरनाथमध्ये

Next

- पंकज रोडेकर
ठाणे : फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर पंजाबमधील लुधियाना येथील हॅप्पी शर्मा या युवकाने अंबरनाथमधील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. ‘प्यार दिवाना होता है’ या उक्तीनुसार प्रेमात आंधळे होऊन हे कृत्य करणाºया हॅप्पीला ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने हुडकून काढले. हॅप्पी राहत असलेल्या नावाचीच तीन नगरे त्या परिसरात होती आणि हॅप्पी हे अनेकांचे नाव होते. अखेरीस मतदार यादीची मदत घेऊन नेमका हॅप्पी पोलिसांनी शोधून काढलाच.
अंबरनाथमधील एका १५ वर्षीय मुलीची लुधियाना, पंजाबच्या हॅप्पी शर्मा याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. दररोजचे हाय, हॅलो करताना त्यांची चांगली मैत्री झाली. अवघ्या दोन महिन्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मग त्यांचे व्हीडिओ कॉलींगद्वारे एकमेकांशी बोलणे सुरु होते. हॅप्पी हा तिला भेटण्यासाठी अंबरनाथ येथे आला आणि त्याच दिवशी तो तिला सोबत घेऊनही गेला. याप्रकरणी १७ सप्टेंबर २०१७ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. याचा तपास स्थानिक पोलीस आणि ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनीटद्वारे सुरु झाला. धागेदोरे हाती लागल्यावर ठाणे गुन्हे शाखा युनीट १ ची मदत घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वसंत शेडगे, पोलीस नाईक संजय बाबर, पोलीस शिपाई वंदना पोटफोडे, सीपीयु पोलीस हवालदार प्रतिमा मनोरे, पोलीस नाईक कैलास जोशी यांचे पथक ९ आॅक्टोबर रोजी पंजाबला रवाना झाले. तेथे गेलेल्या भगवान नगर नावाची तीन नगरे असल्याने हॅप्पीला शोधणे कठीण होऊन बसले होते. मतदार यादीची मदत घेत, हॅप्पीला अटक केली.

नातेवाईकांचे फोन वापरायचा
हॅप्पी हा मुलीला फोन करण्यासाठी आपल्या नातेवाईकांचे फोन वापरायचा. बºयादा ते व्हीडिओ कॉलिंगद्वारे बोलत असत. त्या फोनचे लोकेशन चेक केल्यावर ते कॉल पंजाबमधून असल्याचे समोर आले. मात्र, हॅप्पी नावाचे अनेक जण असल्याने त्याच्या चुलत भावाला प्रथम ताब्यातघेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फेसबुकवरील ओळखीतून ते एक मेकांच्या प्रेमात पडले. त्यातूनचे तो तिला अंबरनाथमधून घेऊन गेला. दाखल गुन्ह्यानुसार,त्या मुलीची लुधियाना येथून सुटका करुन तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. पुढील तपासासाठी त्याला स्थानिक पोलिसांच्या हवाली केले आहे.
-नितीन ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनीट १

Web Title:  A minor kidnapped girl abducted, love on Facebook: Ambernath came from Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.