अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक : पोक्साअंतर्गत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:15 AM2018-02-12T01:15:47+5:302018-02-12T01:15:57+5:30

शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीत तिघा तरुणांनी गावातीलच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 Minor girl raped, three arrested: Pax | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक : पोक्साअंतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक : पोक्साअंतर्गत गुन्हा दाखल

Next

आसनगाव : शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीत तिघा तरुणांनी गावातीलच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तिघांनाही किन्हवली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर पोक्सासह आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना महिन्याभरापूर्वीची असून या प्रकरणी शुक्रवारी तक्रार करण्यात आली.
किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीतील धनाजी पाटील (२३), भरत वाळिंबे (२४), नितीन पाटील या तिघांनी त्यांच्याच गावातील दहावीत शिकणाºया या मुलीला जंगलात नेऊन बलात्कार केला. तसेच याप्रकरणी कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या तिघांपैकीच एकाने बलात्काराचे व्हिडीओ चित्रण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने ही घटना उघडकीस आली.
यापैकी धनाजी याने दोन वर्षांपूर्वी पिडीत मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच तेव्हापासून तो धमकावून तिच्यावर अत्याचार करत होता.
व्हिडीओ झाला व्हायरल-
या मुलीला जंगलात नेऊन बलात्कार केला. तसेच याप्रकरणी कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या तिघांपैकीच एकाने बलात्काराचे व्हिडीओ चित्रण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने ही घटना उघडकीस आली.

Web Title:  Minor girl raped, three arrested: Pax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.