शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मैत्रिणीचा इन्स्टाग्रामवर विनयभंग : ठाण्यातील दोघांची बालसुधारगृहात रवानगी

By जितेंद्र कालेकर | Updated: October 12, 2018 22:36 IST

अकरावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्रामवर एका १५ वर्षीय मुलीशी चॅटींग करुन नंतर तिच्याशी फोनद्वारे अश्लील संभाषण केले. याप्रकरणी या दोघांनाही नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देवारंवार केले अश्लील संभाषणनौपाडा पोलिसांनी केली कारवाईअकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रताप

ठाणे : पाचपाखाडी परिसरात राहणा-या एका पंधरावर्षीय शाळकरी मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री करून वारंवार अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग करणा-या १६ आणि सतरावर्षीय मुलांना ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले असून दोघांची बालन्यायालयाने भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केली आहे.पाचपाखाडीतील या मुलीशी इन्स्टाग्रामवर ठाण्यातील अकरावीमध्ये शिकणा-या एका मुलाशी ओळख झाली. त्याच्याशी चॅटिंग करतानाच त्याने कोपरीतील विनय (१७) आणि नौपाड्यातील प्रवीण (१६, दोघांच्याही नावात बदल केला आहे.) या आणखी दोन अकरावीतील आपल्या मित्रांशी तिची ओळख करून दिली. कालांतराने विनय आणि प्रवीण यांच्याशीही तिची चांगली मैत्री झाली, पण ते तिच्याशी अश्लील संभाषण करू लागले. वारंवार फोन करूनही तिच्या भावना चाळवल्या जातील, असे संभाषण त्यांनी सुरू केले. सुरुवातीला तिने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. पण, गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार वाढतच गेल्याने तिने वडिलांच्या निदर्शनास हा प्रकार आणला. वडिलांनी त्यांचे संभाषण फोनवर रेकॉर्ड करून नौपाडा पोलीस ठाण्यात ११ आॅक्टोबर रोजी या दोघांविरुद्ध तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करून कोपरी आणि नौपाड्यातून या दोघांनाही ताब्यात घेतले. अल्पवयीन असल्यामुळे त्यांना भिवंडीच्या बालन्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग