अल्पवयीन मुलीचा वकिलाने केला विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:02 IST2018-12-14T23:00:47+5:302018-12-14T23:02:14+5:30
पालघर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.

अल्पवयीन मुलीचा वकिलाने केला विनयभंग
पालघर: वडराई (गोंदाली पाडा) येथील अॅड. अशोक भाईंडकर (६८) यांनी आपल्या घरी कागदपत्रे देण्यासाठी आलेल्या एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी त्यास सातपाटी सागरी पोलीसानी अटक केली आहे. पालघर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.
आरोपी महिकावती मंदिरा जवळ राहत असून १२ फेब्रुवारी रोजी गोंदाली पाड्या जवळील एका दुकानात पोस्टमास्तरने ठेवलेली कागदपत्रे देण्यासाठी पाड्यातीला बारा वर्षांची मुलगी आली होती. सायंकाळी घरात कुणी नसल्याचा फायदा उचलीत आरोपीनी तिला आपल्या बंगल्या जवळ उभ्या केलेल्या गाडी जवळ बोलावले. गाडीच्या डिकीत तुझ्यासाठी चॉकलेट ठेवल्याचे सांगितल्यावर तिने डोकावले असता तिच्या मनात लज्जाउत्पन्न होईल असे वर्तन त्यांनी केले. तिने घडला प्रकार घरी सांगताच पाड्यातील लोकांनी आरोपीचे घर गाठले. तो तेथे नसल्याने पालकांनी सातपाटी सागरी पोलीस स्थानकात जाऊन अॅड. भार्इंडकर यांच्या विरोधात तक्र ार दाखल केली. तक्र ार दाखल केल्यानंतर आरोपी मुंबईत पळून गेला होता. गुरु वारी पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालया समोर हजर केले.