खासगी कोविड रुग्णालयातील मेडीकलला किरकोळ आग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 03:07 PM2020-08-12T15:07:08+5:302020-08-12T15:07:44+5:30

सुदैवाने कोणतेही जीवीतहानी नाही, रुग्णालयातील कोवीडच्या चार रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयात हलविले

Minor fire at private Kovid hospital medical in thane | खासगी कोविड रुग्णालयातील मेडीकलला किरकोळ आग

खासगी कोविड रुग्णालयातील मेडीकलला किरकोळ आग

Next

ठाणे  : गुजरात, अहमदाबाद येथे काही दिवसांपूर्वी कोवीड रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही रुग्णांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच ठाण्यातही घोडबंदर भागातील एका खाजगी कोवीड रुग्णालयातील मेडीकलला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. तसेच आगीची दाहकता कमी असल्याने ही आग तत्काळ विझविण्यात ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला यश आले आहे. तर या ठिकाणी उपचार घेत असलेल्या आयसीयुमधील चार कोवीड बाधीत रुग्णांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घोडबंदर भागातील वाघबीळ परिसरातील एका वाणिज्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दिया मल्टी स्पेशालिटी रु ग्णालय आहे. अतिदक्षता विभागासह 20 खाटांचे हे रु ग्णालय आहे. या रु ग्णालयामध्येच दिया मेडीकल आहे. मंगळवारी रात्री या मेडीकलमध्ये किरकोळ आग लागून रु ग्णालयात सर्वत्र धुर पसरला. या रु ग्णालयातील अतिदक्षता विभागात चार करोनाबाधित रु ग्णांवर उपचार सुरु  होते. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या पथकाने आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग लागल्यानंतर पथकाकडून वीज पुरवठा खंडीत करण्यात येतो. मात्र, रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडीत केला तर अतिदक्षता विभागातील यंत्रणा ठप्प होऊन त्याचा त्रस रु ग्णांना होण्याची भिती होती. त्यामुळे अग्निशमन दलाने एकीकडे रु ग्णालयातील आग विझविण्याचे काम सुरु होते तर दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने रुग्णांना रुग्णवाहीकेच्या माध्यमातून दुसरीकडे हलविण्याचे काम सुरु केले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी महापालिकेचे डॉ. अनिरु द्ध माळगावकर यांच्याशी संपर्क साधून बाळकुममधील कोवीड रु ग्णालयामध्ये रु ग्णांसाठी चार खाटा राखीव केल्या होत्या. मात्र, संबंधित रु ग्णालयाचे डॉ. प्रमोद जाधव यांनी पालिका रु ग्णालयाऐवजी रु ग्णांना त्यांच्याच मुंबईतील रु ग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने या रु ग्णांना रु ग्णवाहीकेच्या माध्यमातून भांडूपमधील भाठिया रु ग्णालयात हलविले. आग विझविण्याबरोबरच रु ग्णांना तात्काळ दुस:या ठिकाणी हलविल्यामुळे याठिकाणी मोठा अनर्थ टळला. मेडीकलच्या वातानुकूलीत यंत्नणामध्ये शॉकसर्कीट  होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पालिकेने वर्तविली आहे.

Web Title: Minor fire at private Kovid hospital medical in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.