अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:47 IST2020-01-11T04:46:56+5:302020-01-11T04:47:01+5:30

वर्तकनगर परिसरातील एका नऊवर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणा-या तुषार शिंदे (बदललेले नावे) या तरुणाला वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली.

Minor arrested for sexually assaulting | अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

ठाणे : वर्तकनगर परिसरातील एका नऊ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणा-या तुषार शिंदे (बदललेले नावे) या तरुणाला वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
तुषारने ७ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगरनाक्याकडे जाणा-या रस्त्यावर एका टेम्पोमागे वर्तकनगर भागातील एका अल्पवयीन मुलाला नेले. तिथे या मुलाचे तोंड दाबून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. याबाबत कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी त्याने दिली. याबाबत मुलाने पालकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ८ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच दिवशी आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध पोक्सो तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Minor arrested for sexually assaulting