शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

झेंडूच्या शेतीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 06:43 IST

डोळखांबमधील तरुणाने केला प्रयोग, ठिबक आणि मिल्चंग पेपरचा केला वापर

- वसंत पानसरेकिन्हवली : शहापूर तालुक्यात मुख्यत: भातशेती केली जाते. पूर्णत: निसर्ग आणि हवामानावर अवलंबून असलेल्या या भातशेतीत शेतकऱ्यांना अनेकदा तोटा होतो. परिणामी, शेतकरी विशेषत: तरुणवर्ग शेतीकडे पाठ फिरवताना दिसतो. त्यातही काही शेतकरी असे आहेत, जे जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आपल्या शेतात काही ना काही वेगळे प्रयोग करतात. शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाºया डोळखांबजवळील गुंडे येथील अजित चौधरी (३०) या शेतकºयाने झेंडूच्या शेतीतून दीड लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे.तालुक्यातील शेतकरी भेंडी, काकडीचे उत्पादन घेण्याचे प्रयोग करत असताना अजित चौधरी यांनीही हा वेगळा प्रयोग केला आहे. आपल्या २५ गुंठ्यांच्या जागेत अजित यांनी झेंडूच्या पिकाची लागवड केली आणि भरघोस उत्पन्नही घेतले. ठिबक आणि मिल्चंग पेपरचा वापर करून कोलकाता जातीच्या झेंडूचे पीक घेतले आहे. दसरा, दिवाळी या सणाच्या हंगामात मागणी असल्याने त्यांच्या झेंडूला बाजारात ४० ते ८० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. त्यांच्या २५ गुंठे मध्यम प्रतीच्या जमिनीत झेंडूचे सुमारे ५०० टनापर्यंत उत्पादन झाले. यातून त्यांना दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळाल्याचे चौधरी यांनी सांगितले.

झेंडूची लागवड करण्यासाठी सुरु वातीला ट्रॅक्टरने उभीआडवी खोल नांगरट करावी लागते. जमीन चांगली तापल्यानंतर जमिनीचा दर्जा सुधारतो. नांगरणीमुळे भुसभुशीत झालेल्या या जमिनीत दोन फुटांवर सºया पाडून त्यानंतर बुरशीनाशकाचा डोस, फवारणी करण्यात आली. त्यावर ठिबक सिंचन नलिका पसरवल्या. ओलावा टिकण्यासाठी मिल्चंग पेपरचा वापर केला. मिल्चंगला दीड फूट अंतरावर फिरत्या पद्धतीने छिद्र पाडून त्यात झेंडूची लागवड करण्यात आली. त्यासाठी त्यांनी नारायणगाव येथील रोपवाटिकेतून एक रुपया दराने प्रतिरोप याप्रमाणे झेंडूची सात हजार रोपे आणून लागवड केली. लागवडीनंतर ४० दिवसांत कळ्या आल्या. सुरुवातीला आलेल्या कळ्या खुडून टाकण्यात आल्या, यामुळे झाडे जोमदार होण्यास मदत झाली. झेंडू पिकाला वेळोवेळी खताची मात्रा देण्यात आली. तसेच औषधफवारणी केल्यामुळे पीक जोरदार आले. नियमितपणे फुलांचा तोडा सुरू झाल्यानंतर दररोज तोडा केला गेला.
झेंडूबरोबर मिरची, वांगी लागवडया तरु ण शेतकºयाने झेंडूबरोबर चमेली, मिरची आणि वांग्यांची लागवड केली होती. त्यातून दररोज ५०० रुपये उत्पन्न मिळत होते.उत्तम नियोजन व तांत्रिक पद्धतीचा वापर करून घेतलेल्या झेंडूच्या फुलांच्या शेतीला परिसरातील अनेक शेतकºयांनी भेट दिली. शेतकºयांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने बाजारभावाची हमी दिल्यास तरु णवर्ग शेतीकडे वळेल. - अजित चौधरीअजित चौधरी यांच्याशी फुलशेतीच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने निवडणुकीचे काम सुरू आहे. निवडणुकीचे काम झाले की, त्याची पाहणी करणार आहे. त्यांचा हा प्रयोग अभिनव आहे. - दिलीप कापडणीस, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी