शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मध्यमवर्गींयावर सुवर्ण कु-हाड ! ज्वेलर्सचा विरोध : फसव्यांना पळून जाऊ देता मग आम्हालाच वेठीस का धरता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:45 IST

ज्वेलर्सकडील हमखास परताव्याच्या गुंतवणूक योजना केंद्र सरकार नियमबाह्य ठरवण्याच्या विचारात असले तरी ज्वेलर्सकडील या योजना म्हणजे ठेवी नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांची गुंतवणूक आहे.

स्नेहा पावसकर ठाणे : ज्वेलर्सकडील हमखास परताव्याच्या गुंतवणूक योजना केंद्र सरकार नियमबाह्य ठरवण्याच्या विचारात असले तरी ज्वेलर्सकडील या योजना म्हणजे ठेवी नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांची गुंतवणूक आहे. या योजनांना नियमबाह्यठरवून सरकार केवळ ज्वेलर्सवरच नाही तर सामान्य ग्राहकांवरही अन्याय करणार आहे. नीरव मोदी, चोक्सी अशा फसव्यांना हे सरकार पळून जाऊ देते आणि आता इतरांच्या धंद्यावर गदा आणणार असेल तर ते चुकीचे आहे असा एकमुखी सूर ज्वेलर्स वर्गाकडून लावला आहे.सोन्यामध्ये गुंतवणूक करणाºयांची संख्या आजही मोठी आहे. लग्नकार्यप्रसंगी मुलींना, मुलांना दागिने भेट दिले जातात. तसेच महिलांमध्ये दागिन्याची क्रेझ कायम आहे. मात्र सोन्याचे दागिने बनवताना एकरकमी पैसे देणे सर्वसामान्यांना शक्य नसते. त्यामुळे भविष्याचा विचार करता सामान्य नागरिक दर महिन्याच्या मिळकतीतून थोडी थोडी रक्कम बाजूला काढून ज्वेलर्सकडे गुंतवतात. वर्षअखेरीस त्या एकूण रकमेत काही अधिक पैसे भरून एखादा दागिना बनवतात. मग अशा ग्राहकांसाठी ज्वेलर्सकडे काही आकर्षक योजना असतात.११ किंवा १२ हप्ते भरल्यावर त्यावर एक महिन्याच्या हप्त्याची रक्कम किंवा २४ महिने पैसे भरल्यावर पुढील २ महिन्याच्या हप्त्याची रक्कम ज्वेलर्स स्वत: भरतात. शिवाय घडणावळीवर सूट देतात. अशा विविध आकर्षक योजना ठाणे-मुंबईतील सुमारे ५०-६० टक्के ज्वेलर्सकडे गेल्या २० वर्षांपासून सुरू आहेत. सुमारे १००० रूपयांपासून पुढे कितीही पैसे गुंतवले जाऊ शकतात. छोट्या ज्वेलर्सबरोबरच मोठ्या ज्वेलर्सकडेही या योजना सुरू आहेत. या योजनेत जास्तीत जास्त मध्यमवर्गीय ग्राहक विश्वासाने पैसे गुंतवत असतात आणि आजपर्यंत या योजनेत एखादा अपवाद वगळता फसवणूक झालेली नाही. बांधकाम विकासक क्षेत्रातील ठेवी हा प्रकार वेगळा असतो मात्र ज्वेलर्स क्षेत्रातील अशा ठेवी या केवळ ग्राहकांची बचत व्हावी या उद्देशाने सुरू आहेत, असे असे ज्वेलर्सचे म्हणणे आहे.

टॅग्स :Goldसोनं