शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत जल्लोष, नागरी कर्तव्ये जपण्याचा दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 2:32 PM

हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत ढोलताशा पथकांचे शिस्तबद्ध वादन आणि लेझिमचा तालावर फेर धरणारे शाळकरी विद्यार्थी यांचा जल्लोष पाहावयास मिळाला.

डोंबिवली - हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत ढोलताशा पथकांचे शिस्तबद्ध वादन आणि लेझिमचा तालावर फेर धरणारे शाळकरी विद्यार्थी यांचा जल्लोष पाहावयास मिळाला. या तालावर यात्रेत सहभागी झालेले विविध संस्थांचे चित्ररथ आपआपला संदेश घेऊन पुढे सरकरत होते. तर काही ठिकाणी यात्रेत सहभागी असलेल्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत तर कुठे पुष्पवृष्टी केली जात होती. हा स्वागत यात्रेचा डौल, जल्लोष आणि संदेश पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी एकच गर्दी केली होती.शहराच्या पश्चिम भागातील भागशाळा मैदान येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती राहूल दामले व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी गुढीचे पूजन केले. त्याचबरोबर पालखी पूजन करुन यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यंदाच्या स्वागत यात्रेची थीम नागरीकांची कर्तव्ये, सुंदर व स्वच्छ डोंबिवली अशी असल्याने डोंबिवली गणेश मंदिराने भारतीय राज्य घटनेची उद्देशीका व नागरीकांच्या कर्तव्ये असा भला मोठा फलक व चित्ररथच तयार केला होता. यात्रेत ढोल ताशा पथकाला ढोल ताशा वादनाची परवानगी देण्यात आले होती. त्यात २० ढोल व ताशे वादनाची मुभा दिली गेली होती.मनोदय ट्रस्टच्या वतीने प्रत्यक्ष संवादावर भर द्या. सोशल मिडियामुळे प्रत्यक्ष संवाद होत नसल्याचे नमूद केले होेते. मनशक्ती केंद्राच्या वतीने स्मार्ट पिढी ही चारित्र्य संपन्न व्हावी असे आवाहन केले होते. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश दिला गेला. स. वा. जोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रीन इंडियाचा संदेश दिला. डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या वतीने ई बँकिंगचा वापर करा असे आवाहन करण्यात आले. फीडींग इंडियाने अन्नाचा नास करु नका असा संदेश दिला. उर्जा फाऊंडेशनने आई बंगल्याजवळ प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश देणारा देखावा चित्तारला होता. सायकल क्लबने फिट रहा तर कोकण कुणबी रहिवासी संघटनेने मोबाईल वापराचा अतिरेक टाळा असे चित्ररथ तयार केले होते. यात्रेवर पुष्पवृष्टीशहराच्या पश्चीम भागातील दीनदयाळ रोडवर भाजप नगरसेविका मनिषा धात्रक व नगरसेवक शैलेश धात्रक यांनी यात्रेवर पुष्पवृष्टी करुन जोरदार स्वागत केले. ब्राह्मण महासंघ व खान्देश मराठा सेवा संघाच्या वतीने यात्रेत सहभागी झालेल्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जात होते. मराठावाडा विदर्भ रहिवासी संघाने पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती केली.  डोंबिवलीची स्वागतयात्रा भाजपा शिवसेनाकडून हायजॅक डोंबिवलीची स्वागतयात्रा राज्यभर चर्चाचे विषय ठरत असतो. मात्र यंदा ही स्वागतयात्रा राजकीय पक्षांनी हायजॅक केल्याचे दिसून आले. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानापासून पूर्वेतल्या गणेश मंदिरापर्यंत ही स्वागतयात्रा जाते. मात्र या संपूर्ण रस्त्यावर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्या वतीने झेंडे व बॅनरबाजी करण्यात आली होती. ग्रामीण भागात स्वागतयात्रेतून अध्यात्मिक संदेशडोंबिवली- पिंपळेश्वर महादेव भक्तमंडळ यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेतून आध्यात्मिक संदेश देण्यात आला. तसेच मंदिरात ह.भ.प रमेश महाराज चाळीसगाव यांचे कीर्तन सादर क रण्यात आले. कीर्तनातून प्रबोधन करीत मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले.सोनारपाडा ते पिंपळेश्वर मंदिर आणि स्टार कॉलनी ते पिंपळेश्वर मंदिर अश्या दोन ठिकाणाच्या उपयात्रेचा समारोप पिंपळेश्वर मंदिरात होतो. या यात्रेत श्री गणेश मंडळ आणि शंखेश्वर नगर विद्यालय या दोन शाळेच्या लेझीम पथकाने सहभाग घेतला होता. अनंत संप्रदायाचे वारकरी दिंडीत सहभागी झाले होते. या स्वागतयात्रेत १ ते २ हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. स्वागतयात्रेत आणि कीर्तनात सहभाग घेणाऱ्या नागरिकांसाठी मंदिरातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रकाश म्हात्रे यांनी दिली.

टॅग्स :Gudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८dombivaliडोंबिवली