वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून व्यापाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST2021-08-14T04:45:44+5:302021-08-14T04:45:44+5:30

अमीर खान हे गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास कारखान्यातून काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, त्या ठिकाणी अमोल गुरुनाथ ...

The merchant was beaten out of anger for insulting his father | वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून व्यापाऱ्यास मारहाण

वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून व्यापाऱ्यास मारहाण

अमीर खान हे गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास कारखान्यातून काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, त्या ठिकाणी अमोल गुरुनाथ पाटील, मेहबूब जब्बार पटेल, शादाब अहमद आफताब अन्सारी यांनी येऊन अमोलचे वडील गुरुनाथ पाटील यांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. त्यानंतर या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी परिसरातील नागरिक, व्यापारी अमीर यांना वाचविण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली. या मारहाणीनंतर हे त्रिकूट त्या ठिकाणाहून पसार झाले. जखमी अमीर खान यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अमोल गुरुनाथ पाटील, मेहबूब जब्बार पटेल, शादाब अहमद आफताब अन्सारी यांना अटक केल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जमीर शेख यांनी दिली आहे.

Web Title: The merchant was beaten out of anger for insulting his father