शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

भिवंडीसह मीरा-भाईंदरचा कचराप्रश्न लवकरच निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:59 IST

नगरविकासचे ८०.४२ कोटींचे अनुदान; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता

-नारायण जाधवठाणे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यातील सर्व शहरे हगणदारीमुक्त करून कचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करण्याचा विडा महाराष्ट्र शासनाने उचलला आहे. यानुसार, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या दोन महापालिकांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यास नगरविकास खात्याने बुधवारी प्रशासकीय मान्यता देऊन ८० कोटी ४२ लाख ४३ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.यात भिवंडी महापालिकेचा वाटा ३४ कोटी ७४ लाख ४३ हजार रुपये, तर मीरा-भार्इंदर महापालिकेचा वाटा ४५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये आहे.यातील भिवंडी महापालिकेला केंद्र शासनाकडून १२ कोटी १६ लाख पाच हजार, राज्य शासनाकडून आठ कोटी १० लाख ७० हजार रुपये मिळणार असून महापालिकेला १४ कोटी ४७ लाख ६८ हजारांचा भार चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानातून उचलावा लागणार आहे.अशाच प्रकारे मीरा-भाईंदर महापालिकेलाही केंद्र शासनाकडून १५ कोटी ९८ लाख ९० हजार, राज्य शासनाकडून १० कोटी ६५ लाख ९३ हजार रुपये मिळणार असून महापालिकेला १९ कोटी तीन लाख ४६ हजारांचा भार चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणाºया अनुदानातून उचलावा लागणार आहे.फेबु्रवारीअखेरपर्यंत कचरा वर्गीकरणाचे बंधनघनकचरा अधिनियम २०१६ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे डीपीआर तयार करण्यात आले असून त्यानुसारच त्याची काटेकोर अंमलबजावणी करावयाची आहे. यात सर्वात महत्त्वाची अट म्हणजे शहरात निर्माण होणाºया दैनंदिन घनकचºयाचे निर्मितीच्या ठिकाणी जागेवरच १०० टक्के ओला व सुका असे विलगीकरण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.यानुसार, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या दोन्ही महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणाºया दैनंदिन घनकचºयावर फेबु्रवारी २०१९ अखेरपर्यंत अशा प्रकारे ९० टक्के विलगीकरण क्रमप्राप्त आहे. ही अटच आता दोन्ही महापालिकांना मारक ठरणार आहे. कारण, येत्या महिनाभरातच त्यांना या अटीची पूर्तता करावयाचे शिवधनुष्य पेलायचे आहे.ते अतिशय कठीण दिसत आहे. कारण, यापूर्वी नवी मुंबईवगळता ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर यासारख्या मोठ्या महापालिकाही त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणाºया घनकचºयाचे ओला व सुका असे निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण करण्यातसपशेल नापास झाल्या आहेत. तसेच काही प्रमाणात असे वर्गीकरण होत असले, तरी त्याची विल्हेवाट मात्र एकत्रित होत आहे.बायोमायनिंग अन् कम्पोस्टनिर्मितीची अटघनकचरा व्यवस्थापनेनुसार दोन्ही महापालिकांना कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यानुसार जुन्या साठवलेल्या कचºयाची ९० टक्के जागा पुनर्प्राप्त करावयाची आहे. याशिवाय, घनकचरा अधिनियमानुसार कचºयाची शास्त्रोक्त वाहतूक, विल्हेवाट लावून निर्माण होणाºया कम्पोस्टची शासनाने नेमून दिलेल्या प्रयोगशाळेतून तपासणी करून हरित महासिटी ब्रॅण्ड मिळवून त्याची विक्री करावयाची आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नbhayandarभाइंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकbhiwandiभिवंडी