धोकादायक इमारतींबाबत आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST2021-06-28T04:27:09+5:302021-06-28T04:27:09+5:30

------------------- जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा उल्हासनगर : कॅम्प नं- १ फालुदा गल्लीतील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी दुपारी दीड वाजता छापा ...

Meeting today on dangerous buildings | धोकादायक इमारतींबाबत आज बैठक

धोकादायक इमारतींबाबत आज बैठक

-------------------

जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा

उल्हासनगर : कॅम्प नं- १ फालुदा गल्लीतील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी दुपारी दीड वाजता छापा टाकून मनीष भाटिया व मुकेश भाटिया यांना अटक केली. त्यांच्याकडून जुगारासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य जप्त केले असून, याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------

४३ हजारांचा ऐवज लंपास

उल्हासनगर : कैलास कॉलनी परिसरात राहणारे दीपक सोनावणे यांनी घराच्या हॉलमधील टेबलावर मोबाईल, रोख रक्कम असलेली पर्स ठेवली होती. शनिवारी रात्री चोरट्याने हॉलमध्ये ठेवलेले मोबाईल व पर्समधील १० हजार लंपास केले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-----------------------

नागरिकांची बैठक

उल्हासनगर : महापालिकेने श्री हरी कॉम्प्लेक्समधील दुकानदारांची विनंती फेटाळून इमारतीवर पाडकाम कारवाई केली. कारवाईच्या विरोधात श्री हरी कॉम्प्लेक्समधील दुकानदार न्याय मागत असून, काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी त्यांची बैठक घेत म्हणणे ऐकून घेतले. तसेच त्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

Web Title: Meeting today on dangerous buildings