ज्येष्ठ नागरिक घेणार आज आयुक्तांची भेट

By Admin | Updated: August 20, 2016 04:43 IST2016-08-20T04:43:43+5:302016-08-20T04:43:43+5:30

भार्इंदर पश्चिम येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील योगा वर्ग चालण्यावरुन झालेल्या वादात एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य शनिवारी

A meeting of the Commissioner today to take senior citizens | ज्येष्ठ नागरिक घेणार आज आयुक्तांची भेट

ज्येष्ठ नागरिक घेणार आज आयुक्तांची भेट

मीरा रोड : भार्इंदर पश्चिम येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील योगा वर्ग चालण्यावरुन झालेल्या वादात एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य शनिवारी आयुक्तांची भेट घेणार आहे. तर स्थानिक नगरसेवकांनीही वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. उड्डाणपुलाजवळील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र भार्इंदर ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळास व्यवस्थापनासाठी दिले आहे. तर गेल्या वर्षभरापासून केंद्रासमोरील शेड मध्ये योगा वर्ग सुरु आहेत. परंतु योगा वर्ग दुसरीकडे चालवा अशी संघाची मागणी आहे. बुधवारी खुर्च्या जागेवर ठेवण्यावरुन वाद होऊन मुरारीलाल जोगानी (६९) यांना दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाने ढकल्याने ते जखमी झाले.

Web Title: A meeting of the Commissioner today to take senior citizens