शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

मीरा रोडच्या शाळेने २ मुलांना काढले, शुल्कवाढीविरोधात पालकांचा आंदोलनात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:15 AM

मीरा रोड : शाळेच्या मनमानी शुल्कवाढीविरोधातील आंदोलनात पालकांनी पुढाकार घेतला म्हणून निशाद शेख यांच्या पहिली तसेच तिसरीत शिकणा-या दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा प्रताप मीरा रोडच्या वादग्रस्त कॉस्मोपोलिटीन शाळा व्यवस्थापनाने केला

मीरा रोड : शाळेच्या मनमानी शुल्कवाढीविरोधातील आंदोलनात पालकांनी पुढाकार घेतला म्हणून निशाद शेख यांच्या पहिली तसेच तिसरीत शिकणा-या दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा प्रताप मीरा रोडच्या वादग्रस्त कॉस्मोपोलिटीन शाळा व्यवस्थापनाने केला आहे. शिक्षण उपसंचालकांनी दोन वेळा पत्र देऊनही दोन्ही मुलांना शाळेत पुन्हा प्रवेश दिलेला नाही. तर, प्रशासन अधिकाºयांनीदेखील उपसंचालकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शाळेची पाठराखण चालवली आहे.मीरा रोडच्या शीतलनगरमधील कॉस्मोपोलिटीन शाळा व्यवस्थापनाने नियमबाह्यरीत्या केलेली शुल्कवाढ तसेच अतिरिक्त शुल्क वसुलीविरोधात पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. याप्रकरणी पालकांनी तत्कालीन महापौर गीता जैन यांच्यासह शिक्षण विभागाकडे दाद मागितली होती. उपायुक्त दीपक पुजारी आणि प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनी सुनावण्या घेतल्या होत्या. परंतु, शाळा व्यवस्थापनाने आडमुठेपणा चालवला होता. पालकांच्या आंदोलनात फूट पडल्यावर पाच पालकांविरुद्ध शाळा व्यवस्थापनाने मीरा रोड पोलीस ठाण्यात विविध कारणांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.परंतु, शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी आणि बेकायदा शुल्क वसुलीविरोधात लढण्यासाठी पुढाकार घेणाºया पालक निशाद शेख यांच्या पहिलीतील आसीफ शेख आणि तिसरीतील आयशा शेख या दोघा पाल्यांना मात्र त्रास देण्यास सुरुवात झाली. आधी त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. नंतर, शाळा व्यवस्थापनाने दोन्ही मुलांना शाळेतून काढूनच टाकले.शाळेने मुलांना काढून टाकल्याने निशाद यांनी बचाव समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. बी.बी. चव्हाण यांच्याकडे दाद मागितली. चव्हाण यांनीही २६ आॅक्टोबर रोजी शाळा व्यवस्थापनास पत्र देऊन असे शाळे बाहेर काढणे योग्य नसल्याचे म्हटले.>मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळवून देण्याची प्रक्रिया सुरूतत्काळ या दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश नियमित करून ७ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. त्याचसोबत प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनादेखील दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश करून घ्यावेत, असे सांगतानाच शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, ठाणे जिल्हा परिषद यांना सादर करण्याचे आदेशही दिले होते. परंतु, शाळा व्यवस्थापनासह देशमुख यांनीदेखील शिक्षण उपसंचालकांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली.हवालदिल झालेल्या निशाद यांनी पुन्हा उपसंचालकांकडे दाद मागितली. त्यावर चव्हाण यांनी १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा पत्र दिले. आरटीई कायद्याचा अवमान करत आहात, असे व्यवस्थापनाला ठणकावत दोन दिवसांत आदेशाचे पालन करा. अन्यथा, नियमभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे बजावले. तर, देशमुख यांनाही १० नोव्हें. पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगूनही कार्यवाही न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत अहवाल सादर करण्यास बजावले.उपसंचालकांच्या या दुसºया आदेशालादेखील शाळा आणि देशमुख यांनी केराची टोपली दाखवली आहे. शाळेत जाता येत नसल्याने दोन्ही मुलं आजारी पडली असून आपणही प्रचंड तणावाखाली आहोत. उपोषणासाठी पत्र दिले असता त्याचीही परवानगी पोलिसांनी दिली नसल्याचे निशादने सांगितले. मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळवून देण्याची तसेच शाळेविरोधात कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Schoolशाळाmira roadमीरा रोड