शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये शुक्रवारपासून पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 19:44 IST

मीरा रोड - लघु पाटबंधारे विभागाने पाण्याच्या पुढील नियोजनासाठी पाणीकपात लागू केली असून, मीरा-भाईंदर शहराची पाणीकपात देखील शुक्रवारी ५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे.

मीरा रोड - लघु पाटबंधारे विभागाने पाण्याच्या पुढील नियोजनासाठी पाणीकपात लागू केली असून, मीरा-भाईंदर शहराची पाणीकपात देखील शुक्रवारी ५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. दर १५ दिवसांनी म्हणजेच पुढील शुक्रवार वगळता पुन्हा पुढच्या शुक्रवारी अश्या पद्धतीने हि पाणी कपात असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे .मीरा-भाईंदर शहराला सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ९० ते ९२ दशलक्ष लिटर तर स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर असा मिळून १७६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा रोज रोज होत आहे. मीरा-भाईंदर हे टेलएन्ड ला असल्याने या आधी देखील पाणी कपातीतून मीरा भाईंदरला वगळण्यात येत होते .दरम्यान पावसाळा सुरू होईपर्यंत बारवी व उल्हास नदी जलस्त्रोतातील पाणी पुरवावे लागणार असल्याने पाण्याच्या नियोजनाकरिता लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी २७ डिसेंबरपासून दोन आठवड्यांतून एक दिवस म्हणजेच पंधरा दिवसांतून एका शुक्रवारी बारवी धरणातून २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.सदर पाणी कपात अंमलात आणण्यासाठी मीरा-भाईंदर शहरास होणारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा पाणीपुरवठा शुक्रवार ५ जानेवारी व त्यापासून दर १५ दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासाकरिता पाणी बंद राहणार असल्याने पाणी कपातीनंतर पुढील दोन दिवस पाणीपुरवठा उशिराने व कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे तसेच पाण्याचा पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी केले आहे. येत्या शुक्रवारची पाणी कपात ही फक्त एमआयडीसीकडून होणाऱ्या ९० दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यासाठी असली तरी त्या नंतरची १५ दिवसांनी होणारी पाणी कपात ही एमआयडीसी सह स्टेमकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यास देखील लागू होणार असल्याचे वाकोडे यांनी सांगितले .

टॅग्स :WaterपाणीMira Bhayanderमीरा-भाईंदर