शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मीरा-भाईंदर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर : पाणीपट्टी, बसप्रवास महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:59 IST

तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टीत दरवाढ, नव्याने पाणीपुरवठा लाभकर व साफसफाई कर लावणे, मालमत्ता कराच्या दरात वाढ, पालिका परिवहन बस सेवेच्या तिकीटदरात वाढीची शिफारस करण्या आली आहे.

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेचे १६३४ कोटी ५५ लाख ९७ हजार रुपयांचे २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प सोमवारी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी स्थायी समिती सभापती अशोक तिवारी यांना सादर केला. मागील तीन वर्षांतील सरासरी प्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्चावर आधारित अर्थसंकल्प तयार केल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. कोणतीही थेट करवाढ केली नसली तरी तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टीत दरवाढ, नव्याने पाणीपुरवठा लाभकर व साफसफाई कर लावणे, मालमत्ता कराच्या दरात वाढ, पालिका परिवहन बस सेवेच्या तिकीटदरात वाढीची शिफारस करण्या आली आहे.२०१९-२० चा अर्थसंकल्प तत्कालीन आयुक्तांनी १५६८ कोटींचा सादर केला होता. यात महासभेने वाढवून १७०३ कोटी ९१ लाखांवर नेला होता. आता हाच अर्थसंकल्प केवळ ११९२ कोटी ७७ लाखांवर आल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधी वारेमाप अर्थसंकल्प फुगवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही पुढील आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प हा तब्बल १६३४ कोटींपर्यंत फुगवण्यात आली आहे.अर्थसंकल्पातून परिवहन समितीला मूळ अंदाजपत्रकातून २७ कोटी ८३ लाख रुपये दिले जाणार आहे. महिला बालकल्याण समितीसाठी चार कोटी ७२ लाख; वृक्ष प्राधिकरणासाठी आठ कोटी ७५ लाख; दिव्यांगांसाठी दीड कोटी, शिक्षण मंडळासाठी २७ कोटी ५२ लाख; दुर्बल घटक-दलित वस्तीसाठी ७६ कोटी ८३ लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. २१८ दशलक्ष लिटरच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी; मुख्यमंत्री सडक योजना, सिमेंट रस्ते व नगरोत्थान साठी १०२ कोटी; यूटीडबल्यूटी अंतर्गत सिमेंट रस्त्यांसाठी ७५ कोटी ; अमृत अभियान पर्जन्य जलवाहिन्यांसाठी ५४ कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनसाठी १६ कोटी; बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन सांस्कृतिक भवन -कलादालनासाठी ६ कोटी; घोडबंदर किल्ला जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणसाठी पाच कोटींची तजवीज आयुक्तांनी केली आहे. पालिकेवरील कर्ज परतफेडसाठी ४१ कोटी ३३ लाख ; आस्थापनेवर १४२ कोटी ४७ लाख; शहर सफाईसाठी १५१ कोटी ६५ लाख खर्च केलेजाणार आहेत.अशी असेल उत्पन्नाची बाजूउत्पन्नाच्या दृष्टीने जीएसटीच्या अनुदानातून २२१ कोटी, मालमत्ता करातुन ८५ कोटी, संस्था कर मुद्रांक शुल्कातून ६२ कोटी, इमारत विकास आकारमार्फत ७० कोटी, रस्ता नुकसानभरपाईसाठी ५० कोटी, मोकळ्या जागांवरील करापोटी २२ कोटी, घनकचरा शुल्कापोटी १३ कोटी ७५ लाख बेकायदा बांधकाम शास्तीमधून तीन कोटी तर जाहिरात व पे एण्ड पार्कमधून १० कोटी ७५ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. तर शासनाकडून अनुदानापोटी तब्बल ५८० कोटी ७१ लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय तब्बल २७० कोटींचे कर्ज पालिका घेणार आहे.2018-2019या वर्षात रस्त्यावरील दिवाबत्तीचा खर्च २८ कोटी ९४ लाख इतका झालेला असल्याने वीज बचतीची आवश्यकता आयुक्तांनी नमुद केली आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBudgetअर्थसंकल्प