शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
3
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
4
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
6
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
7
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
8
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
9
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
10
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
11
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
12
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
13
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
14
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
15
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
16
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
17
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
18
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
19
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
20
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?

पाच लाखांची लाच घेणारा वैद्यकीय आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 4:28 AM

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई

ठाणे : ठाणे महापालिकेच्या रुग्णालयासाठी दीड कोटींच्या व्हेंटिलेटर्सचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारणारा ठामपाचा वादग्रस्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजू मुरुडकर याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी रात्री अटक केली. त्याच्याविरुद्ध रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.वाढत्या कोरोना रुग्णांसाठी ठामपाला ३० व्हेंटिलेटर्सची तातडीने खरेदी करायची होती. त्यासाठी प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून नवी मुंबईच्या एका कंपनीकडून चार लाख ९५ हजारांमध्ये एक असे ३० व्हेंटिलेंटर्स एक कोटी ४८ लाख ५० हजारांमध्ये खरेदी केले जाणार होते. हा ठेका या कंपनीला मिळवून देण्यासाठी या रकमेतील दहा टक्के रक्कमेची म्हणजे १५ लाखांची मागणी मुरुडकर याने या कंपनीच्या प्रतिनिधीकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. कंपनीने ते मान्य करून आधी पाच लाख आणि नंतर दहा लाख रुपये देण्याचे ठरले. यातील पहिला हप्ता मुरुडकरला त्याच्या ऐरोली येथील एका खासगी रुग्णालयात देण्याचेही ठरले. दरम्यान, कंपनीने याबाबतची तक्रार ठाणे एसीबीकडे केली. याची पडताळणी झाल्यानंतर हाच पाच लाखांचा पहिला हप्ता घेतांना त्याला गुरुवारी (८ एप्रिल रोजी ) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेची रक्कमही हस्तगत केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.