शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

'डॉक्टर आपल्या दारी' अभियानांर्गत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील पोलिसांची वैद्यकीय तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:19 IST

कोविड वॉरिअर्स असलेल्या पोलीसांना कोरोनाची लागण व त्यातून होणारे मृत्यू पाहता पोलीसांच्या प्राथमिक तपासणीची मिशन पोलीस स्टेशन अशी मोहीम भारतीय जैन संघटना , देश अपनाए फाऊंडेशन व महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री यांनी संयुक्तपणे सुरु केलेली आहे .

मीरारोड - संस्थांनी मिळून सुरु केलेल्या डॉक्टर आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त पोलीस ठाण्यां मधील पोलीसांची वैद्यकीय तपासणी केली गेली आहे . कोविड योद्धया पोलीसांच्या सुरक्षिततेसाठी मिशन पोलीस स्टेशन हि संकल्पना राबवली जात आहे . तर सुमारे साडेतीन लाख नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून मोफत औषध उपचार केले गेले आहेत .कोविड वॉरिअर्स असलेल्या पोलीसांना कोरोनाची लागण व त्यातून होणारे मृत्यू पाहता पोलीसांच्या प्राथमिक तपासणीची मिशन पोलीस स्टेशन अशी मोहीम भारतीय जैन संघटना , देश अपनाए फाऊंडेशन व महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री यांनी संयुक्तपणे सुरु केलेली आहे . डॉक्टर , परिचारिका आदींचे पथक मीरा भाईंदर सह मालाड, घाटकोपर, टीळकनगर, ठाणे आणि डोंबिवली अश्या सुमारे ६० पेक्षा जास्त पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.सामान्य जनतेलाही प्राथमिक तपासणी करता यावी यासाठी महिनाभरात मीरा भाईंदर, जी-साऊथ, जी-नॉर्थ, एफ नॉर्थ, अंधेरी, बोरीवली, कांदिवली, वांद्रे, मुलुंड, घाटकोपर, भांडुप, पवई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या भागामध्ये मोबाईल क्लिनिक सेवा सुरु केली आहे .सुमारे ५७ डॉक्टर व ५७ पेक्षा जास्त मोबाईल दवाखाना सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत ३,४६,४८५ नागरिकांनी लाभ घेतला आहे. यातील ५,६५८ रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. क्रेडाइ-एमसीएचआयचे अध्यक्ष नयन शाह म्हणाले कि , मुंबई आणि उपनगरांची लोकसंख्या बघता वैद्यकीय सेवेवर मोठ्याप्रमाणावर ताण येत आहे. या उपक्रमा मुळे पालिकेवरचा ताण बराच कमी झाला आहे .भारतीय जैन संघटनेचे संस्थापक, शांतीलाल मुथा म्हणाले कि , राष्ट्रीय स्तरावर हा उपक्रम सुरु असून गरजूं नागरिकांसह पालिका , शासकीय यंत्रणेला या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे . महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुरू केल्या आहेत.देश अपनाए फाऊंडेशनचे संस्थापक वल्लभ बंसाली यांनी सांगितलं की, मोबाइल व्हॅनमुळे गरीब लोकांना याचा जास्त फायदा होईल. आणि जास्तीत जास्त कोविड रुग्ण शोधण्यास मदत होईल. माजी अध्यक्ष धर्मेश जैन यांनी सांगितले कि , निसर्गसारखे चक्रीवादळ आले तरी सुद्धा आमच्या टीमने न डगमगता रुग्णाच्या सेवेला प्राधान्य दिले. या सेवेचा फायदा प्रत्येकाला व्हावा म्हणून आम्ही सर्वांनी तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.भारतीय जैन संघटनेतर्फे राष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १ एप्रिल ते आतापर्यंत १२,७०,५८७ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तर १५,४८२ रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्यासा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी आतापर्यंत २२७ डॉक्टरांच्या मदतीने २२७ मोबाइल क्लिनिक व्हॅनचा वापर करण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरPoliceपोलिस