जालान, पुजारीसह सहा जणांवर मकोका कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:34 IST2018-06-08T00:34:14+5:302018-06-08T00:34:14+5:30
कुख्यात बुकी सोनू जालान आणि गँगस्टर रवी पुजारीसह सहा जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी आता मोक्कांतर्गत कारवाई सुरु केली आहे. सोनू क्रिकेटवर सट्टा खेळल्याच्या प्रकरणात पोलीस कोठडीत आहे.

जालान, पुजारीसह सहा जणांवर मकोका कारवाई
ठाणे : कुख्यात बुकी सोनू जालान आणि गँगस्टर रवी पुजारीसह सहा जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी आता मोक्कांतर्गत कारवाई सुरु केली आहे. सोनू क्रिकेटवर सट्टा खेळल्याच्या प्रकरणात पोलीस कोठडीत आहे. यातून बाहेर येण्यापूर्वीच त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोनू जालान तसेच गँगस्टर पुजारीने तीन कोटींच्या खंडणीसाठी बोरिवलीतील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात १ जून रोजी दाखल झाला आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकाने पथकाने २९ मे रोजी सोनूला अटक केली. दरम्यान, अभिनेता अरबाज खानने त्याच्याकडे सट्टा लावल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच या व्यापाºयाच्या अपहरणानंतर त्याच्याकडून खंडणी घेऊन ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. या व्यापाºयानेही त्याच्याकडे आयपीएलवर पावणेतीन कोटींचा सट्टा लावला होता.
याच पैशांच्या वसुलीसाठी सोनूने गँगस्टर रवी पुजारी तसेच मुनीर खान, ज्युनिअर कलकत्ता, किरण माला, केतन तन्ना ऊर्फ राजा या अन्य बुकींच्या मदतीने जानेवारी २०१८ च्या पहिल्या आठवड्यात त्याच्याकडे तीन कोटींची मागणी केली. केतन तन्नााने व्यापाºयाला गाडीतून मालाड येथे नेले. तिथे सोनू आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्याला ठार मारण्याची धमकी देऊन २५ लाखांची खंडणी घेतली. याच प्रकरणात सोनूसह सहा जणांविरुद्ध मोकका लावण्याची मागणी ठाणे न्यायालयाकडे केली असून ती मान्य झाली आहे.