एमबीएची बोगस डिग्री; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:54 IST2019-03-06T23:54:30+5:302019-03-06T23:54:32+5:30

एमबीए अभ्यासक्रमाची बोगस डिग्री प्रमाणपत्रे देणाऱ्या प्रशिक्षण संस्थेविरोधात ठाणे गुन्हे शाखेने सोमवारी दुपारी कारवाई केली.

 MBA bogus degree; Thane crime branch action | एमबीएची बोगस डिग्री; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

एमबीएची बोगस डिग्री; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

डोंबिवली : एमबीए अभ्यासक्रमाची बोगस डिग्री प्रमाणपत्रे देणाऱ्या प्रशिक्षण संस्थेविरोधात ठाणे गुन्हे शाखेने सोमवारी दुपारी कारवाई केली. याप्रकरणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नागपूर येथील कोराडी रोड भागात असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग’ संस्थेमधून बोगस प्रमाणपत्रे दिली जात होती. याप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापक पल्लवी चौहान, संचालक नईम यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. हा प्रकार किती वर्षांपासून सुरू होता, अशा पद्धतीने अजून किती जणांना अशाप्रकारच्या बोगस डिग्री देण्यात आल्या, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Web Title:  MBA bogus degree; Thane crime branch action