ग्लोबल हॉस्पिटलच्या किचनची महापौरांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:34+5:302021-05-27T04:42:34+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेचे सर्वांत महत्त्वाचे, कोरोना रुग्णांना जीवदान देणाऱ्या ग्लोबल हॉस्पिटलच्या किचनला बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांनी ...

ग्लोबल हॉस्पिटलच्या किचनची महापौरांकडून पाहणी
ठाणे : ठाणे महापालिकेचे सर्वांत महत्त्वाचे, कोरोना रुग्णांना जीवदान देणाऱ्या ग्लोबल हॉस्पिटलच्या किचनला बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांनी अचानक भेट देऊन तेथील स्वच्छता व अन्नाचा दर्जा, गुणवत्ता व योग्यतेची पाहणी केली.
या हॉस्पिटलमुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोणत्याही खाजगी मोठ्या रुग्णालयाप्रमाणे अद्ययावत सेवा येथे महापालिका मोफत उपलब्ध करून देत आहे. चांगले डॉक्टर, सोबत सर्व कर्मचारी, स्वच्छता, अत्याधुनिक यंत्रणा या सर्व आघाड्यांवर हे रुग्णालय रुग्णसेवेत अव्वल ठरले आहे.
यावेळी भाजपा नगरसेवक संजय वाघुले आणि शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे हेही सोबत होते. किचनमधील स्वच्छता आणि जेवण बनविण्याची पद्धत, आरोग्याच्या दृष्टीने योग्य असे जेवण, त्याची गुणवत्ता, अन्नपदार्थासाठी वापरलेले पदार्थ, तेल, भाज्या, फळे यांची स्वच्छता व गुणवत्ता, तसेच पँकिंग, गोडाऊन या सर्व बाबींची महापौरांनी पाहणी करून कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.