भिवंडीत मॉर्डन फुटवेअर गोदामाला भीषण आग, चप्पल-बूट जळून खाक

By नितीन पंडित | Updated: December 15, 2023 17:47 IST2023-12-15T17:47:41+5:302023-12-15T17:47:54+5:30

घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

Massive fire guts modern footwear godown in Bhiwandi | भिवंडीत मॉर्डन फुटवेअर गोदामाला भीषण आग, चप्पल-बूट जळून खाक

भिवंडीत मॉर्डन फुटवेअर गोदामाला भीषण आग, चप्पल-बूट जळून खाक

- नितीन पंडित

भिवंडी :  काल्हेर येथील श्री अरिहंत कंपाऊंड या गोदाम संकुलात स्पार्क या प्रख्यात चप्पल बूट निर्मिती कंपनीचे चप्पल बूट साठवलेल्या मॉर्डन फुटवेअर या गोदामास भीषण आग लागण्याची घटना शुक्रवारी घडली आहे.
      
घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आग गोदामाच्या शेवटच्या टोकाला लागली असल्याने अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी भिंतीस चार ठिकाणी छिद्र पडून आगीवर नियंत्रण मिळविले आहे .दरम्यान आगीचे कारण अजून अस्पष्ट असून या आगीत लाखो रुपयांचे चप्पल बूट जळून खाक झाले आहेत.

Web Title: Massive fire guts modern footwear godown in Bhiwandi