ठाण्यात स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 09:52 PM2019-10-21T21:52:32+5:302019-10-21T22:05:08+5:30

ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या वतीने महाराष्ट्रातील २२ शहीदांसह देशभरातील २९२ हुताम्यांना पोलीस दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

Martyrs to police for martyrdom in Thane | ठाण्यात स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

शहीद पोलीस कुटूंबीयांची उपस्थिती

Next
ठळक मुद्देशहीद पोलीस कुटूंबीयांची उपस्थितीमहाराष्ट्रातील २२ शहीदांसह देशभरातील २९२ हुताम्यांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे:भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या वतीने महाराष्ट्रातील २२ शहीदांसह देशभरातील २९२ हुताम्यांना पोलीस दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.


राष्ट्र निष्ठेची जाणीव व्हावी यासाठी २१ आॅक्टोबर १९५९ पासून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. ठाण्यात यानिमित्त सोमवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह मुख्यालयाच्या कर्मचा-यांनी देशभरातील शहीद पोलिसांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली.
लडाख येथील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलीस जवान २१ आॅक्टोबर १९५९ रोजी गस्त घालीत होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या चीनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि अखेरच्या क्षणांपर्यत झुंज दिली. या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले. याच घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. सोमवारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या स्व. चिंतामण दिघे उद्यानातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून पोलीस आयुक्त फणसळकर यांनी सकाळी ८ वाजता श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्रातील २२ शहीद हुताम्यांसह देशभरात शहीद झालेल्या २९२ हुताम्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सह पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्यासह शहीद पोलीस हवालदार भालचंद्र कर्डिले, शहीद पोलीस नाईक तुकाराम कदम, शहीद पोलीस हवालदार रमेश जगताप आणि शहीद पोलीस नाईक बाळू गांगुर्डे यांचे कुटूंबीय तसेच पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Martyrs to police for martyrdom in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.