विवाहितेला विवस्त्र करून मारहाण

By Admin | Updated: May 6, 2017 05:53 IST2017-05-06T05:53:25+5:302017-05-06T05:53:25+5:30

जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी ३० वर्षांच्या विवाहितेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी पूर्वेतील सागाव

Married to marriage | विवाहितेला विवस्त्र करून मारहाण

विवाहितेला विवस्त्र करून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी ३० वर्षांच्या विवाहितेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी पूर्वेतील सागाव परिसरात घडली. याप्रकरणी तिने मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात तिन्ही आरोपींची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.
पीडिता कचरा टाकण्यासाठी पहिल्या मजल्यावरून जिन्याने खाली जात होती. तेव्हा तेथेच राहणाऱ्या तीन जणांनी तिला गाठले. तिला पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत तिला लिफ्टसमोरील बांधकामाचे साहित्य ठेवलेल्या खोलीत नेले. त्यानंतर, आरोपींनी तिला भिंतीच्या दिशेने जोरात ढकलून तिला विवस्त्र केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना अजूनही अटक झालेली नाही.

Web Title: Married to marriage