शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

२२ लाखांचा हुंडा घेऊनही विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 5:15 AM

वडिलांकडून पैसे आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी अनामिका मिश्रा (२४, रा. कासारवडवली, ठाणे) या विवाहितेने कासारवडवली पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे : ११ लाखांची रोकड, तसेच ११ लाख १९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने इतका हुंडा तसेच भेटवस्तू देऊनही घर घेण्यासाठी वडिलांकडून पैसे आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी अनामिका मिश्रा (२४, रा. कासारवडवली, ठाणे) या विवाहितेने कासारवडवली पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.एका खासगी संकेतस्थळावर माहिती मिळाल्यानंतर रोहित मिश्रा (२८) यांच्याशी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी अनामिकाचे लग्न झाले. त्याआधी ११ डिसेंबर २०१८ रोजी रोहितच्या आईवडिलांनी मुलीच्या वडिलांकडून दागिने तसेच महागड्या वस्तूंची मागणी केली. मुलीचे लग्न मोडले जाऊ नये, या भीतीने २१ हजारांच्या रोकडसह शगुनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नवरदेवाच्या नातेवाइकांना कपडेही त्यांनी केले. तसेच २८ जानेवारी २०१९ रोजी घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट, निसर्ग गार्डन लॉन्स, साखरपुडा कार्यक्रमातही त्यांनी पाच लाखांची रोकड आणि एक तोळ्याची सोन्याची अंगठी, दोन तोळ्यांची सोन्याची सोनसाखळी, संपूर्ण संसारोपयोगी वस्तू दिल्या. लग्नाच्या वेळीही लग्नाच्या संपूर्ण खर्चासह नवरदेवाला पाच लाख रुपये, तीन तोळ्यांचे ब्रेसलेट, घड्याळ, मुलीला साडेपाच तोळ्यांचा हार तसेच इतर दागिने आणि काही वस्तू दिल्या.मात्र, तरीही लग्नानंतर सासरे राजेश मिश्रा, सासू सरला, नणंद मीनाक्षी पांडे आणि पती रोहित यांनी अनामिकाला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. वडिलांनी घर तसेच दागिने दिले नसल्याच्या कारणास्तव सासू, नणंदेने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर, क्षुल्लक कारणावरून सासऱ्यानेही मारहाण केली. १८ जून रोजी पतीनेही मारहाण केली. या प्रकाराला कंटाळून तीने पोलिसांत जात गुन्हा दाखल केला.