डोंबिवली - मनसेतर्फे आज ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन भरवण्यात आली होती. स्पर्धेचा आनंद लुटणासाठी डोंबिवलीकराची गर्दी झाली होती तर तब्बल साडे 500 ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या स्पर्धेत 88 वर्षाच्या आजोबांनी भाग घेतला तर 80 वर्षाच्या अनेक आजी आजोबा सहभागी झाले होते. ही स्पर्धा 6 गटात पार पडली. स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी जेष्ठ नागरिक सकाळी 6.30 पासून उपस्थित होते. त्याच्या चेहऱ्यावर आनंद तर होताच तर ही स्पर्धा दर वर्षी व्हावी असा आग्रही त्यांनी केला. यावेळी जेष्ठ नागरिकांनी कविता, शेरोशायरी केली आणि आभार प्रदर्शन केले. स्पर्धेत ९२ वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक राजाराम राणे, ८८ वर्षांचे अनंता काळू भोईर काका, सर्वात पहिली डोंबिवली लोकल चालवणारे भोकरे काका यांचा मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला. मानसी मोरे, नील मॅथ्यू, अक्षय पवार, हर्ष फाफळे, प्रांजळ पुराणिक, सौमित्र बेंडाळे, मनेश गाढवे, रोशन खेतीयार हे नॅशनल लेव्हलचे ॲथलिट सदर मॅरेथॉनला उपस्थित होते. तसेच भोईर जिमखान्याचे मुकुंद भोईर, टिळकनगर विद्यालयाच्या लिना ओक-मॅथ्यु मॅडम, रोटरी क्लब आफ डोंबिवली एलिटचे सर्व सदस्य उपस्थित होते. डोंबिवली मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी मनसे नेते प्रमोद (राजु) पाटील,परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे,उद्योजक प्रदीप रुंगठा,शहर संघटक संजीव ताम्हाणे, नाहर हॉस्पीटलचे दिनेश हिरामण पाटील,ईश्वर हॉस्पीटलचे नरेंद्र जैन यांनी विशेष सहकार्य केले.
डोंबिवली भरली ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 13:31 IST