शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आणि दुकानांवर मराठी पाट्या लागल्या

By अजित मांडके | Updated: January 25, 2024 16:08 IST

अशा दुकानदारांच्या बाबतीत महापालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही, याचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने सुरू केले होते. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत शहरातील २४८० दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. परंतु त्याचा चांगला परिणाम ठाण्यात काही प्रमाणात का होईना दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या आहेत. मात्र काही ठिकाणी प्रशासनाला दिसाव्या म्हणून फ्लेक्सच्या स्वरुपात पाट्या लावण्यात आल्याचे चित्रही दिसत आहे. तर काही दुकानांवर आधी इंग्रजी नंतर मराठी अशा स्वरुपाच्या पाट्या दिसत आहे. तर काहींनी प्रामाणिकपणे सुरवातीला मराठी नंतर इंग्रजीला महत्व दिले आहे. त्यामुळे अशा दुकानदारांच्या बाबतीत महापालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

दुकाने व विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचननेनुसार महापालिका, नगरपंचायत व नगरपरिषदेला कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मराठी पाट्या नसलेल्या दुकाने आणि विविध आस्थापनांना नोटीसा बजावण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईसाठी त्यांनी शहरातील नऊ प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती.  सहाय्यक आयुक्तांनी पथके तयार करून शहरात दुकानांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यात दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत कि नाही याची खातरजमा करण्यात येत आहे. प्रत्येक आस्थापनेचा नामफलकावरील अक्षर मराठी भाषेत आहेत का, मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान आहे का, याची तपासणी पथकाकडून केली जात आहे. या दुकानांना ३० डिसेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या बसविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. या मुदतीनंतरही पाट्या मराठीत झाल्यानंतर कामगार विभागाला तसा अहवाल पाठविण्यात येईल. कारण कारवाईचे अधिकार या विभागाला असल्याने त्यांच्याकडून मात्र अद्यापही कोणत्याही स्वरुपाची कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही.

दरम्यान सध्या ठाणे महापालिकेने शहरातील २४८० दुकानादारांना ३० डिसेंबर पर्यंत नोटीस बजावल्या आहेत. त्यानंतर, आता शहरात दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या आहेत. काहींनी प्रशासनाचे नियमांचे पालन केल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. मात्र काही दुकानांदारांनी यातूनही पळवाटा काढल्याचे चित्र आहे. काहींनी नवीन मराठी पाट्या लावण्याचा खर्च वाढेल म्हणून बॅनर फ्लेक्स तयार करुन तात्पुरत्या स्वरुपात दुकानावर चढविल्याचे दिसत आहे. दुसरीकडे काहींनी मराठीला दुसºया नंबरवर ठेवून इंग्रजीला पहिले महत्व दिले आहे. तर काहींनी मराठीला आधी प्राधान्य दिल्याचे समाधानकारक चित्र आहे. एकूणच न्यायालयाच्या दट्यानंतर दुकानदारांनी किमान मराठीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांची आकडेवारी 

प्रभाग समिती              -          मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांची संख्या कोपरी-नौपाडा            -           ४४७माजिवाडा-मानपाडा      -           २०९लोकमान्य-सावरकरनगर   -         २७८उथळसर                 -            ४२०वर्तकनगर                -            १००कळवा                    -            ११९मुंब्रा                       -           ३६०दिवा                       -           २२५वागळे इस्टेट            -            ३२२एकूण                    -           २४८०

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका