मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

By Admin | Updated: June 16, 2017 01:58 IST2017-06-16T01:58:04+5:302017-06-16T01:58:04+5:30

भिवंडीतील काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने आणखी एकाला अटक केली. विक्रम म्हात्रे (२९) असे त्याचे नाव आहे.

Manoj Mhatre murder case: Another man arrested | मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडीतील काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने आणखी एकाला अटक केली. विक्रम म्हात्रे (२९) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून आरोपींची संख्या १७ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फेब्रुवारी महिन्यात म्हात्रे यांची निर्घृण हत्या क रण्यात आली होती. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतरही राजकीय दबाव दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. याचदरम्यान, याप्रकरणी ठाणे पोलिसांनी २० जणांना मोक्का लावला. तसेच खंडणी पथकाने आतापर्यंत मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे याच्यासह १५ जणांना अटक केली असून त्यामध्ये विक्रम याचाही समावेश आहे. विक्रम याच्यावर ठाणे शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असून त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.

Web Title: Manoj Mhatre murder case: Another man arrested