उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी मनिषा आव्हाळे
By सदानंद नाईक | Updated: January 16, 2025 21:50 IST2025-01-16T21:50:00+5:302025-01-16T21:50:11+5:30
अखेर गुरुवारी आयुक्त पदी पुणे सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी मनिषा आव्हाळे
उल्हासनगर : महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सचिव पदी नियुक्ती झाल्यावर, आयुक्त पदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे देण्यात आला होता. अखेर गुरुवारी आयुक्त पदी पुणे सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची बदलीनंतर आयुक्त पदासाठी अंबरनाथ नगरपरिषदेचे प्रशासक डॉ प्रशांत रसाळ यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान गुरुवारी पुणे सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी आयुक्तपदी मनीषा आव्हाळे यांची आयुक्त पदी नियुक्ती झाली. आव्हाळे या महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त असणार असून त्यांच्या नियुक्तीने महापालिका आयुक्त पदाचा सस्पेन्स संपल्याचे बोलले जात आहे. फोटो : मनिषा आव्हाळे पाठविला आहे